Zika Virus: महाराष्ट्रात नव्या व्हायरसचा धोका.. Pune जिल्ह्यात सापडला झिका व्हायरसचा पहिला रुग्ण
पुणे: राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंतच नव्या वायरसने राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढविली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुरंदर तालुक्यातल्या बेलसर आणि परिंचे या भागात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ताप असलेले रुग्ण […]
ADVERTISEMENT

पुणे: राज्यात कोरोनाच्या (Corona) दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंतच नव्या वायरसने राज्याच्या आरोग्य विभागाची चिंता वाढविली आहे. पुणे (Pune) जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा (Zika Virus) संसर्ग असलेला पहिला रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.
पुरंदर तालुक्यातल्या बेलसर आणि परिंचे या भागात जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच ताप असलेले रुग्ण आढळून येत होते. त्यातील पाच रुग्णांचे नमुने 16 जुलै रोजी पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी तीन जणांना चिकुनगुनिया या आजाराचे निदान झाले. त्यानंतर राष्ट्रीय विज्ञान संस्थेच्या डेंगू आणि चिकुनगुनिया विभागाचे प्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या नेतृत्वाखालील टीमने बेलसर आणि परिंचे भागातील आणखी काही 41 रुग्णांचे नमुने तपासणीसाठी नेले.
या नमुन्यांमधील 27 जणांना चिकुनगुनिया तर तीन जणांना डेंगूची लागण झाल्याचं अहवालावरून स्पष्ट झाले. मात्र बेलसर येथील एका 50 वर्षीय महिलेला झिका या विषाणूजन्य आजाराची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. 30 जुलै रोजी या महिलेचे रक्ताचे नमुने घेऊन तपासणी करण्यात आली होती. महाराष्ट्रात (Maharashtra) झिका विषाणूची आढळलेली ही पहिलीच रुग्ण आहे. ही महिला चिकुनगुनिया बाधित देखील असल्याचे स्पष्ट झाले असल्याने हा मिश्र विषाणू संसर्ग आहे. दरम्यान, ही माहिती समोर येताच पुण्यासह अवघ्या महाराष्ट्रात खळबळ माजली आहे.
दुसरीकडे राज्यात पहिल्यांदाच झिका या विषाणूचा रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. झिका व्हायरचा रुग्ण मिळाल्याचे समजताच राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथकाने बेलसर गावातील परिस्थितीची तात्काळ पाहणी केली. झिका विषाणूने बाधित असलेली महिलेची तब्येत चांगली असल्याचे राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी सांगितले आहे.









