ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर का होत नाही? फडणवीसांचं सरकारकडून स्पष्टीकरण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : नवं नाव आणि चिन्ह मिळाल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीची तयारी सुरू केली. पण, ठाकरेंची डोकेदुखी कायम आहे. ठाकरे गटाच्या उमेदवार आणि दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांचा प्रशासकीय सेवेतील राजीनामा अद्याप मंजूर केलेला नाही. त्यामुळेच शिंदे-ठाकरेंमधील सुप्त राजकीय संघर्षाची चर्चा पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

ADVERTISEMENT

याप्रकरणात ऋतुजा लटके यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांच्या याचिकेवर गुरुवारी सकाळी 11 वाजता न्यायमूर्ती नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे. तर दुसरीकडे ऋतुजा लटके यांचा राजीनामा राजीनामा मंजूर करू नये यासाठी आयुक्तांवर दबाव आहे. तसेच लटके यांना आपल्या गटात नेण्यासाठी शिंदे गटाकडून मंत्रिपदाची ऑफर देण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते अनिल परब यांनी केला.

या सगळ्यावर आता शासनाकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. कोणाच्याही राजीनाम्यासंदर्भात काही ना काही नियम असतात. त्या नियमांमध्ये तो स्वीकारला जाईल. नियम सर्वांसाठी सारखे आहेत. महापालिका पूर्णपणे स्वायत्त आहे. त्यांच्या नियमांप्रमाणे ते निर्णय घेतील. आमच्याकडून कोणावरही कोणताही दबाव आणला जात नाही. सरकार काहीही हस्तक्षेप करत नाही. त्यात आमचा हस्तक्षेप नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

हे वाचलं का?

तर ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्याबाबत मुंबई महानगपपालिकेचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनीही खुलासा केला आहे. ते म्हणाले, राजीनाम्यावर काम सुरू आहे. लटके यांनी ३ ऑक्टोबर २०२२ रोजी राजीनामा दिला आहे. नियमांनुसार मी ३० दिवसांमध्ये निर्णय घेऊ शकतो. तसेच शासनाच्या दबावाचा कोणताही प्रश्न येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT