रक्ताच्या थारोळ्यात सापडला पुरुष आणि महिलेचा मृतदेह, शेवटच्या क्षणीही एकमेकांना मारली होती मिठी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, अमरावती: अमरावती (Amravati) जिल्ह्यातील परतवाडा पोलीस स्टेशन परिसरात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. येथे विवाहित महिला आणि पुरुषांचे रक्ताने माखलेले मृतदेह (Dead body) एकमेकांचे हात हातात घेतलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. ही घटना बुधवार (23 फेब्रुवारी) रोजी घडली होती. ज्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

ADVERTISEMENT

मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला आणि पुरुष हे गेले अनेक वर्ष रिलेशनमध्ये होते. या दोघांनी एकमेकांवर वार करून आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले.

घटनेच्या तपासासाठी फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय सुधीर कोबडे आणि 35 वर्षीय अलका दौड हे एकमेकांसोबतच राहत होते. या दोन्ही मृतदेहांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी आता याप्रकरणी अधिक तपास सुरु केला आहे.

हे वाचलं का?

आत्महत्या की हत्या?

मिळालेल्या माहितीनुसार दोघांचंही लग्न झालं होतं. मात्र तरीही ते एक प्रकारे लिव्ह इनमध्ये राहत होते. स्थानिकांच्या मते, हे दोघं विवाहित असूनही आपल्या साथीदाराला सोडून लिव्ह इन मध्येच राहत होते.

ADVERTISEMENT

मात्र आता अचानाक दोघांचेही रक्ताने माखलेले मृतदेह सापडल्याने त्यांनी हत्या झालीए की त्यांनी आत्महत्या केली हे अद्याप समजू शकलेलं नाही. अचलपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पंढरी येथील झोपडीत दोघांचे मृतदेह आढळून आले आहेत.

ADVERTISEMENT

लिव्ह इन रिलेशनशीपचा हव्यास… मुलीने जन्मदात्या आईचा गळाच चिरला!

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक आशिष बरगढ म्हणाले की, ही आत्महत्या की हत्या याचा पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदनानंतर त्यांची हत्या झाली की त्यांनी आत्महत्या केली याबाबत नेमकी माहिती समजू शकेले. त्यामुळे सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.

दरम्यान, या घटनेने सुधीर आणि अलका यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. एकाच वेळी दोघांचे मृतदेह ते देखील मिठी मारलेल्या अवस्थेत सापडल्याने दोघांच्या कुटुंबीयांनी हत्येचाच संशय व्यक्त केला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT