Delhi: सकाळी खून, फ्रिजमध्ये मृतदेह, रात्री लग्न… डोक्यात नेमका कोणता कट?
दिल्लीत बाबा हरिदास नगर येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका प्रियकरानेच प्रेयसीची निर्घृण हत्या केली. 24 वर्षीय आरोपी साहिल गेहलोत 9 फेब्रुवारीला रात्री प्रेयसी निक्की यादवच्या घरी पोहोचला. दोघंही पहाटे 5 वाजता एकत्र घराबाहेर पडले. साहिल तासनतास रस्त्यावर फिरत होता. लग्नावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. साहिलचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरल्याने निक्कीला राग आला होता. यावेळी […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिल्लीत बाबा हरिदास नगर येथे एक धक्कादायक प्रकार घडलाय. एका प्रियकरानेच प्रेयसीची निर्घृण हत्या केली.
हे वाचलं का?
24 वर्षीय आरोपी साहिल गेहलोत 9 फेब्रुवारीला रात्री प्रेयसी निक्की यादवच्या घरी पोहोचला.
ADVERTISEMENT
दोघंही पहाटे 5 वाजता एकत्र घराबाहेर पडले. साहिल तासनतास रस्त्यावर फिरत होता.
ADVERTISEMENT
लग्नावरून दोघांमध्ये भांडण झालं होतं. साहिलचं दुसऱ्या मुलीशी लग्न ठरल्याने निक्कीला राग आला होता.
यावेळी रागाच्या भरात साहिलने टोकाचं पाऊल उचलत, डेटा केबलच्या वायरने निक्कीचा गळा आवळून खून केला.
नंतर, तो गावी पोहोचला, तिथे त्याने ढाब्याच्या फ्रीजमध्ये मृतदेह लपवून ठेवला.
निक्कीसोबत राहायचे की घरच्यांच्या सांगण्यावरून अरेंज मॅरेज करायचे या गोंधळात साहिलने प्रेयसीचा जीव घेतला होता.
साहिलच्या म्हणण्यानुसार, कुटुंबीय त्याच्यावर अरेंज मॅरेजसाठी दबाव टाकत होते.
घरच्यांच्या सांगण्यावरून साहिलने 10 फेब्रुवारीला दुसऱ्या मुलीशी लग्नही केलं होतं.
निक्कीच्या वडिलांना त्या दोघांचं अफेअर असल्याचं माहित होतं. साहिल तिच्या वडिलांची दिशाभूल करत होता. तो त्यांना काहीही माहिती देत नव्हता.
अशा स्थितीत मृतदेहाची विल्हेवाट लावण्यापूर्वीच आरोपी साहिल गेहलोतला पोलिसांनी अटक केली.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT