बदलापूरमधील रिक्षा चालकाच्या मुलाची थेट isro मध्ये निवड
कल्याण: बदलापूरमधील एका रिक्षाचालकाच्या मुलाची थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (isro) मध्ये निवड झाली. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन तरुणाचं कौतुक देखील केलं आहे. देवानंद सुरेश पाटील (Devanand Suresh Patil) असं या तरुणाचं नाव असून त्याची इस्त्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे. देवानंद […]
ADVERTISEMENT
कल्याण: बदलापूरमधील एका रिक्षाचालकाच्या मुलाची थेट भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो (isro) मध्ये निवड झाली. त्याच्या याच जबरदस्त कामगिरीबाबत अभिनेत्री उर्मिला मातोंडकर (Urmila Matondkar) हिने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन तरुणाचं कौतुक देखील केलं आहे. देवानंद सुरेश पाटील (Devanand Suresh Patil) असं या तरुणाचं नाव असून त्याची इस्त्रोत ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झालेली आहे. देवानंद याच्या कामगिरीमुळे आता संपूर्ण राज्यातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
ADVERTISEMENT
बदलापूरसारख्या निमशहरी भागातून आलेल्या देवानंदने अतिशय मेहनतीने इस्त्रोपर्यंतचा पल्ला गाठला आहे. देवानंद याचे वडील हे यांनी स्वत: अपार कष्ट करुन आपल्या मुलाला शिकवलं आणि त्याचंच आज देवानंदने चीज केलं आहे. देवानंदचे वडील हे स्वत: रिक्षाचालक आहेत पण त्यांनी आपल्या मुलाला योग्य शिक्षण दिलं ज्यामुळे आज देवानंद हा यशाची शिखरं गाठत आहे.
Oxygen concentrator: ऑक्सिजन कन्सन्ट्रेटर नेमकं आहे तरी काय… त्याची एवढी मागणी का?
हे वाचलं का?
मुळातच हुशार असलेल्या देवानंद याने मॅकेनिकल इंजिनिअर म्हणून आपलं शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर त्याने टाटा स्टिलमध्ये इंजिनिअर म्हणून नोकरी देखील स्वीकाराली. खरं तर टाटामध्ये नोकरी मिळाल्यानंतर देवानंद याला अगदी ऐषोआरामात आपलं जीवन जगता आलं असतं पण त्याने एवढ्यावरच समाधान मानलं नाही. आपल्याला काहीतरी वेगळं करायचंय या ध्येयाने त्याला पछाडलं होतं आणि त्याच ध्येयापायी त्यांनी काम करता-करता काही स्पर्धा परीक्षा देणं देखील सुरु ठेवलं होतं. याचदरम्यान रेल्वे लोको पायलट म्हणून देखील त्याची निवड झाली होती. मात्र, ती नोकरी देखील त्याने नाकारली आणि आपल्या परीक्षा देणं सुरुच ठेवलं.
या सगळ्यात इस्त्रोकडून घेण्यात आलेल्या एका परीक्षेत देवानंद हा थेट ओबीसी गटातून देशात पहिला आला. त्यामुळे त्याची इस्त्रोमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड करण्यात आली आहे. शुक्रवार (30 मे) या परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यावेळी देवानंद आणि त्याच्या कुटुंबीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. कारण त्याने पाहिलेलं स्वप्न हे सत्यात उतरलं होतं.
ADVERTISEMENT
NASA च्या ‘पर्सिव्हरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग
ADVERTISEMENT
आता या परीक्षेनंतर लवकरच त्याला पोस्टिंग देखील मिळणार आहे. त्यामुळे आता थेट देशातील सर्वोच्च अशा अंतराळ संशोधन संस्थेत देवानंद याला कामाची चुणूक दाखवता येणार आहे. देवानंद याच्या या यशाचं कौतुक करावं तेवढं थोडच आहे. कारण प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्याने हे मिळवलेलं हे यश नक्कची निर्भेळ असंच आहे.
दरम्यान, देवानंदच्या या यशाचं कौतुक स्वत: उर्मिला मातोंडकर हिने केलं आहे. तिने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, ‘देवानंद सुरेश पाटील, हा महाराष्ट्रातील बदलापूर येथील ऑटो रिक्षा चालकाचा मुलगा. ज्याची इस्त्रोमध्ये ज्युनिअर सायंटिस्ट म्हणून निवड झाली आहे. एवढचं नव्हे तर तो परीक्षेत ओबीसीमधून पहिला आला आहे. अशी एक विस्मयकारक प्रेरणादायक कथा.. जी अनेकांना प्रेरित करेल. अभिनंदन देवानंद.’
Devanand Suresh Patil, son of an auto rickshaw driver from Badlapur #Maharashtra gets chosen as a junior scientist @isro He stands first amongst OBC candidates.
Such an awe inspiring story..to inspire many more. Congratulations Devanand? #MondayMotivation #mondaythoughts pic.twitter.com/dH9M2z6qzn— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 3, 2021
सध्या देवानंदच्या या कामगिरीचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तसंच त्याच्या कुटुंबीयांचं देखील कौतुक केलं जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT