पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस झाले आक्रमक, पाहा Video

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: महाराष्ट्रात रेमडेसिविर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादारास मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी बोलवल्यानंतर विरोधी पक्ष हा चांगलाच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यासाठी स्वत: विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे बीकेसी येथील पोलीस उपायुक्तांच्या कार्यालयात गेले होते. त्यावेळी ते बरेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. याचा आता एक व्हीडिओ देखील समोर आला आहे.

ADVERTISEMENT

ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना रेमडेसिविर इंजेक्शनच्या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं समजताच देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर अनेक नेते हे पोलीस स्थानकात पोहचले यावेळी एका मंत्र्याच्या ओएसडीने डोकानिया यांना धमकी दिली असा आरोप थेट देवेंद्र फडणवीसांनी केला आहे. यावेळी याचं रेकॉर्डिंग देखील आमच्याकडे आहे असं फडणवीसांनी सांगितलं आहे. पोलीस स्थानकात गेल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे फारच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं.

देवेंद्र फडणवीस एवढ्या तात्काळ का गेले होते पोलीस स्थानकात?

हे वाचलं का?

यावेळी देवेंद्र फडणवीस पोलीस अधिकाऱ्याला असं म्हणत आहेत की, ‘मी तुम्हाला माहिती आहे की नाही मला माहित नाही. मी तुम्हाला जबाबदार देखील धरत नाहीए. पण त्यांना धमकी दिली. धमकी आम्ही टेप करुन ठेवली आहे.’

नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

रेमडेसिवीर या औषधाचा पुरवठा करताना महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्राने भेदभावच करण्यात आला आहे असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. एक गुजरात सरकारच्या लेटरहेडवरचं एक पत्र सादर केलं आहे. निर्यात थांबवण्यात आलेल्या कंपन्यांपैकी एका कंपनीला गुजरात राज्यालाच रेमडेसिवीरचा पुरवठा केला जावा असं सांगणारं हे पत्र आहे. रेमडेसिवीरच्या पुरवठ्याच्या बाबतीत केंद्र सरकारची ही दुटप्पी भूमिका का? असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला होता.

ADVERTISEMENT

त्यानंतर काल रात्री उशिरा मुंबई पोलिसांनी ब्रुक्स फार्मा कंपनीचे मालक राजेश डोकानिया यांना चौकशीसाठी बोलावलं होतं. त्यांच्याकडे रेमडेसिविरचे 60 हजार इंजेक्शन असल्याचा पोलिसांना संशय होता आणि त्यामुळेच त्यांची चौकशी करण्यासाठी त्यांना मुंबई पोलिसांनी त्यांना बोलावलं होतं. मात्र, जेव्हा याबाबत देवेंद्र फडणवीस यांना माहिती मिळाली तेव्हा त्यांना तात्काळ पोलीस स्थानकात धाव घेत याप्रकरणी पोलिसांना जाब विचारला.

दुसरीकडे पोलिसांनी आता राजेश डोकानिया यांना सोडलं असल्याची माहिती देखील फडणवीसांनी दिली. पण राज्य सरकार कोरोना काळात गंभीर राजकारण करत असल्याची टीका त्यांनी केली आहे.

दरम्यान, याप्रकरणी आता अधिक आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस हे प्रकरण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT