Devendra Fadnavis : ‘राजघराण्यांचा अपमान महाराष्ट्र…’,फडणवीसांची राहुल गांधींवर टीका
काँग्रेसने जी थीम ठेवली होती है तयार हम, पण आता हे कशासाठी तयार आहेत.पण लोक म्हणतात, हम तयार नही है, आम्ही तुम्हाला ऐकू इच्छित नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांना लगावला.
ADVERTISEMENT
Devendra Fadnavis Criticized Rahul Gandhi : : “स्वातंत्र्याची लढाई राजा, महाराजांनी लढली नाही तर देशातील नागरिकांनी लढली होती, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले आहे. नागपुरात काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिवसानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते. राहुल गांधी यांच्या या विधानावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राजघराण्यांचा हा अपमान महाराष्ट्र सहन करणार नाही, असे विधान करून देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधीवर (Rahul Gandh) केली आहे. (devendra fadnavis criticized rahul gandhi maharashtra rally and raja maharaja statement maharashtra politics)
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस हे माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधीसह त्यांच्या थीमवर टीका केली आहे. काँग्रेसने जी थीम ठेवली होती है तयार हम, पण आता हे कशासाठी तयार आहेत.पण लोक म्हणतात, हम तयार नही है, आम्ही तुम्हाला ऐकू इच्छित नाही, असा टोला देवेंद्र फडणवीसांनी राहुल गांधी यांना लगावला. तसेच काँग्रेसची ही रॅली महारँली नाही तर सुक्ष्म रँली झाली. या रँलीला उपस्थिती खुपच कमी होती. या रँलीला आलेले लोक राहुल गांधींच्या भाषणाआधी निघून गेली होती.त्यांच भाषण ऐकण्याच्या मानसिकतेत कुणी नव्हते,अशी टीका देखील देवेंद्र फडणवीसांनी केली.
हे ही वाचा : Video: पुण्यात पोलिसासमोरच कोयता गँगची दहशत, दोन गटाच्या वादात कोयत्याने हल्ला
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, मला एका गोष्टीची आश्चर्य वाटलं, या देशामध्ये अनेक आमचे शुर राजे आणि राजघराणे यांनी इंग्रजांशी संघर्ष केला आणि आपलं स्वत्व टीकून ठेवली.आणि आज राहुल गांधी म्हणाले, देशातल्या इंग्रजांनी साठगाठ केली होती. अशाप्रकारे या राजघराण्यांचा अपमान करणे अतिशय चुकीचे आहे. मला असं वाटतं हे कुणी महाराष्ट्रात सहन करणार नाही, अशा शब्दात फडणवीसांनी राहुल गांधीवर टीका केली.
हे वाचलं का?
राहुल गांधी काय म्हणाले?
“स्वातंत्र्याची लढाई देशातील नागरिकांनी लढली होती. राजा, महाराजांनी लढली नाही. त्यांनी इंग्रजांबरोबर हातमिळवणी केली होती. स्वातंत्र्याची लढाई इंग्रजांबरोबरच राजा आणि महाराजांविरोधातही होती. राजा, महाराजांचं इंग्रजांशी संगनमत होते. त्यामुळे गरीबांसाठी काँग्रेसनं स्वातंत्र्याची लढाई लढली होती,” असं राहुल गांधींनी म्हटलं.
हे ही वाचा : ‘मुंबईकडे कूच करणार…’ जरांगेंची घोषणा; महाजन म्हणाले,’…जायची गरजच पडणार नाही’
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT