PM Modi: देवेंद्र फडणवीस… 26 एप्रिल आणि PM मोदींची ‘ती’ मोठी घोषणा
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (7 जून) देशाला संबोधित केलं. आपल्या या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठी घोषणा (Big announcement) केली. 21 जूनपासून देशातल्या 18 वर्षे आणि त्यावरील सगळ्यांना मोफत लस (Free Vaccine) दिली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या संबोधनात केली. लसीकरणाची सगळी जबाबदारी आता […]
ADVERTISEMENT
मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी आज (7 जून) देशाला संबोधित केलं. आपल्या या संबोधनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक मोठी घोषणा (Big announcement) केली. 21 जूनपासून देशातल्या 18 वर्षे आणि त्यावरील सगळ्यांना मोफत लस (Free Vaccine) दिली जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या आजच्या संबोधनात केली.
ADVERTISEMENT
लसीकरणाची सगळी जबाबदारी आता केंद्र सरकारकडे असणार आहे असंही मोदींनी सांगितलं. त्यामुळे लसीकरण मोहिमेसाठी राज्य सरकारांना पैसे खर्च करावे लागणार नाहीत. असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ही जी मोठी घोषणा केली त्याचविषयी राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साधारण महिन्याभरापूर्वीच जाहीर कार्यक्रमात सांगितलं होतं.
हे वाचलं का?
Big News : 21 जूनपासून 18 वर्षांवरील सगळ्यांना मोफत लस-पंतप्रधान
आपण सर्वात आधी पाहूयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नेमकी काय घोषणा केली:
ADVERTISEMENT
‘आज हा निर्णय घेण्यात आला की, राज्यांवर सोपवण्यात आलेलं लसीकरणाचं 25 टक्के काम होतं, त्याची जबाबदारीही भारत सरकार घेणार आहे. येत्या दोन आठवड्यात केंद्र सरकार नवीन नियमावली लागू करणार आहे. या दोन आठवड्यात केंद्र आणि राज्ये मिळून नवीन नियमावली तयार करतील.’
ADVERTISEMENT
‘योगायोग असा की, दोन आठवड्यानंतर आंतरराष्ट्रीय योग दिन ही आहे. 21 जूनपासून देशातील सर्व राज्यातील 18 वर्षांपुढील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी केंद्र सरकार राज्यांना मोफत लस उपलब्ध करून देईल. लस निर्मात्याकडून एकूण लस उत्पादनापैकी 75 टक्के लस केंद्र सरकार स्वतः खरेदी करून राज्यांना देईल. त्यामुळे राज्यांना काहीही खर्च करावा लागणार नाही.’ असं पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केलं
राज्यांना लसीकरणाची मोहीम सोपवल्यानंतर 18 वर्षावरील नागरिकांना कशा प्रकारे मोफत लस देता येईल यावरुन बरीच चर्चा सुरु होती. त्याचवेळी म्हणजे 26 एप्रिल रोजी मुंबईतील एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, 18 वर्षावरील सर्वांना भारत सरकार मोफत लस देईल.
पाहा 26 एप्रिल 2021 रोजी देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते:
‘भारत सरकार या संपूर्ण कोव्हिड काळात राज्यांच्या पाठिशी उभी राहिली आहे. लसीकरणाच्या संदर्भात देखील भारत सरकारने हे स्पष्ट केलं आहे की, प्रत्येक 18 वर्षावरील व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार आहे.’ असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
Free Vaccine: 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार: फडणवीस
दरम्यान, मधल्या काळात केंद्राने 18 वर्षावरील नागरिकांचं लसीकरण हे राज्य सरकारवर सोपवलं होतं. पण अवघ्या काही दिवसातच लस उपलब्धच होत नसल्याने अनेक राज्यांना 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचं लसीकरण बंद करावं लागलं होतं. त्यानंतर अनेक राज्यांनी यासाठी केंद्र सरकारवर टीका केली होती.
या सगळ्या टीकेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या संबोधनातून उत्तर दिलं. तसंच 18 वर्षावरील सर्व नागरिकांचं लसीकरण मोफत होईल आणि ते देखील केंद्र सरकारच करेल असं स्पष्ट केलं.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT