फडणवीसांची चौकशी सुरू; राज्यात अनेक ठिकाणी निदर्शने
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, फडणवीसांना देण्यात आलेली नोटीस आणि चौकशीचा भाजपकडून निषेध केला जात आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप आमदारांसह कार्यकर्तेही जमा झाले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील […]
ADVERTISEMENT
राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. चौकशीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या सागर बंगल्याबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आला. दरम्यान, फडणवीसांना देण्यात आलेली नोटीस आणि चौकशीचा भाजपकडून निषेध केला जात आहे. सागर बंगल्याबाहेर भाजप आमदारांसह कार्यकर्तेही जमा झाले आहेत.
ADVERTISEMENT
देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या वर्षी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा घोटाळा झाला असल्याचा आरोप केला होता. पैसे घेऊन पोलिसांच्या त्यांच्या मर्जीप्रमाणे बदल्या केल्या गेल्या, असा आरोप फडणवीसांनी केलेला आहे. याच प्रकरणात फडणवीसांविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी आज बीकेसी पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर राहण्यासंदर्भात फडणवीसांना नोटीस बजावली होती. मात्र, अचानक चौकशीच्या ठिकाणात बदल करण्यात आला. पोलीस फडणवीस यांची त्यांच्या सागर बंगल्यातच चौकशी केली जात आहे. त्यामुळे बंगल्याबाहेर मोठा बंदोबस्त करण्यात आलेला आहे.
हे वाचलं का?
सहपोलीस आयुक्त नितीन जाधव हे दोन पोलीस कॉन्स्टेबलसह फडणवीसांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. काही वेळापूर्वीच अधिकारी दाखल झाले असून, आता चौकशी सुरू झाली आहे.
राज्यात ठिकठिकाणी निषेध
दरम्यान, फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीशीचा आणि चौकशीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. सागर बंगल्याबाहेर कार्यकर्ते आमदार आले. त्याचबरोबर पुणे, नागपूरसह इतर काही ठिकाणीही भाजप नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी निदर्शने करत याचा निषेध नोंदवला आहे.
“सरकारचं षडयंत्र उघडं पाडल्यानं हे केलं जातंय”; फडणवासांची मुंबई पोलीस करणार चौकशी
देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील पोलिसांच्या बदल्यात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केलेला आहे. या प्रकरणातील माहिती त्यांनी केंद्रीय गृह सचिवांना दिलेली आहे. या प्रकरणाचा तपास सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपवला आहे. या प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचीही चौकशी होणार आहे. मात्र, बदल्यांसंदर्भातील गोपनीय माहिती बाहेर आल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला असून, आज फडणवीसांची चौकशी केली जात आहे.
ADVERTISEMENT
फडणवीस शनिवारी काय म्हणाले होते?
ADVERTISEMENT
“मी आज जे काही बोलणार आहे. मार्च २०२१ मध्ये भाजपच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडी सरकारचा गृह मंत्रालयातील बदल्यांचा महाघोटाळा बाहेर काढला होता. त्यांच्या ट्रान्सस्क्रिप्ट पेनड्राईव्ह मध्ये आहे. ते मी देशाच्या गृह सचिवांकडे सुपूर्द करत असल्याचंही सांगितलं होतं. त्यानुसार या घोटाळ्याची सगळी माहिती दिल्लीत जाऊन केंद्रीय गृह सचिवांना ही माहिती दिली.”
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT