Devendra Fadnavis: ”2019 मध्ये जेव्हा बावनकुळे यांचं तिकीट कापलं गेलं त्यावेळी…”
नागपूर: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काल चंद्रशेखर बाववकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. आज नागपूरमध्ये बावनकुळेंचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी नितीन गडकरी देखील उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करताना काय म्हणाले […]
ADVERTISEMENT
नागपूर: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी काल चंद्रशेखर बाववकुळे यांची प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. आज नागपूरमध्ये बावनकुळेंचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी केंद्रीय नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपल्या भाषणात बोलताना चंद्रशेखर बावनकुळेंच्या (Chandrashekhar Bawankule) अनेक आठवणींना उजाळा दिला. यावेळी नितीन गडकरी देखील उपस्थित होते.
ADVERTISEMENT
चंद्रशेखर बावनकुळेंचं कौतुक करताना काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
”महाराष्ट्र राज्यात भाजप प्रदेश अध्यक्ष पद मिळणं ही मोठी गोष्ट आहे. पक्ष राज्यात सर्वात मोठा आहे, सत्तेत आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामाचा आवाका हा फार मोठा आहे. सामान्य कुटुंबातील बावनकुळे हे सामान्य कार्यकर्ते ते प्रदेश अध्यक्ष पदावर आले. त्यांनी भरपूर मेहेनत केली. बावनकुळे यांचे काम चांगले आहे. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. मतदारसंघात एखादं काम कसं मंजूर करून आणायचं हे बावनकुळे यांना चांगलं माहित आहे” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले ”ऊर्जा मंत्री असतांना बावनकुळे यांनी चांगलं काम केलं. बावनकुळे ऊर्जा मंत्री असतांना तीन कंपन्या नफ्यात आल्या. प्रदेश महामंत्री असतांना बावनकुळे गाव गाव फिरले खूप सुंदर काम त्यांनी केलं. 2019 मध्ये जेव्हा बावनकुळे यांचं तिकीट कापलं गेलं त्यावेळी बरेच तर्क वितर्क लावले गेले पण मी त्यावेळी म्हंटल होत की भविष्यात बावनकुळे खूप मोठे होतील. आपलं नवीन सरकार आले आहे. अडीच वर्षे बाकी आहे, वेळ फार कमी आहे परंतु राज्याला फास्ट ट्रॅक वर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांना दुप्पट मदत दिली. गेले दोन अडीच वर्षे नितीन गडकरी यांच्यामुळे राज्याची इज्जत वाचली. राज्यात चांगला विकास झाला. मजबूत महाराष्ट्र सोबत मजबूत भाजप बनविणार” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
हे वाचलं का?
चंद्रशेखर बावनकुळे आपल्या भाषणात काय म्हणाले?
”मी अमरावती दौऱ्यावर असताना मला भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांचा फोन आला आणि मला प्रदेशाध्यक्ष जवाबदारी देत असल्याचं सांगितलं. मी त्यांना अभिवचन दिलं माझ्या वर दाखविलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. पक्षाच्या प्रतिमेला धक्का न लागू देता मी माझी जवाबदारी पार पाडेल. नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पक्षाला जनसामान्य माणसापर्यंत पोहोचवलं. मला नितिन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांचं मार्गदर्शन मिळेल असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
”मी छत्रपती सेनेत काम करत असताना मला नितिन गडकरी यांनी बोलविले. गोपीनाथ मुंडे यांच्या जनसंघर्ष यात्रेत भाजपमध्ये प्रवेश केला. त्याकाळात माझे पुनर्वसनाचे ४५ लाख तेव्हाचे मंत्री सुनील केदार यांनी अडविले होते तेव्हा नितिन गडकरी यांनी ते मिळवून दिले. मी कधी आमदार होईल अस वाटलं देखील नव्हतं. मला पक्षात सरचिटणीस म्हणून जवाबदारी फडणवीस यांनी दिली. मी युवा वॉरियर्स संकल्पना आणली. २०२४ पर्यंत २५ लक्ष कार्यकर्ते तयार करायचा संकल्प केला आहे. प्रत्येक बूथवर ३० नेते तयार करायचे आहेत. आधीच्या सरकारमधील पालकमंत्री झेंडा वंदन ते झेंडा वंदन होते”.
ADVERTISEMENT
”देवेंद्र फडणवीस यांनी ४० दिवसात ५२ महत्वाचे निर्णय घेतले. हार पुष्पने स्वागत करण्यापेक्षा शेतकऱ्यांना काही मदत करता येईल का असा प्रयत्न करू. ओबीसी आरक्षणाच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी संघर्ष केला सॉलिसिटर जनरल यांना आरक्षण का महत्वाचं हे पटवून कोर्टात बाजू मांडून आरक्षण मिळवून दिलं. प्रदेशाध्यक्षपद काटेरी मुकुट आहे. राज्यातील ७५ टक्के निवडणुका समोर आहे. तिन्ही पक्ष देखील समोर आले तरी त्यांना भाजप काय हे दाखवून द्यायचं आहे. सत्ता आणि संघटना हे सोबत काम करतील” असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT