OBC Reservation : आमच्या हाती सूत्रं द्या, चार महिन्यात आरक्षणाचा प्रश्न सोडवतो नाहीतर राजकीय संन्यास घेतो-फडणवीस
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. आमच्या हाती या आरक्षणाची सूत्रं द्या, चार महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर राजकीय संन्यास घेईन असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात भाजपचं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस […]
ADVERTISEMENT
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपुष्टात आलं आहे. आमच्या हाती या आरक्षणाची सूत्रं द्या, चार महिन्यात हा प्रश्न सोडवला नाही तर राजकीय संन्यास घेईन असं आव्हान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला दिलं आहे. ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार विरोधात भाजपचं चक्काजाम आंदोलन करण्यात आलं. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्वतःला अटक करवून घेतली. यावेळी शहरातील प्रमुख नेते, आमदार यांनी सुद्धा स्वतःला अटक करवून घेतली.
ADVERTISEMENT
नागपुरातील व्हरायटी चौकात भारतीय जनता पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.. हजारो भाजपचे कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकारवर हल्ला बोलतांना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सरकारने एकतर ओबीसींना आरक्षण द्यावे अन्यथा आपली खुर्ची सोडा…. राज्यात आज 1500 पेक्षा जास्त ठिकाणी भाजप चे हजारो कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावर उतरले आहे.. हे सरकार केंद्र कडे बोट दाखवून केंद्राने डेटा दिला नाही.. ओबीसी आरक्षण जनगणनेच्या डेटा वर नव्हे तर empirical data वर अवलंबून आहे..
सरकार मधील तिन्ही पक्ष एकमेकांच्या विरोधात भांडतात. सत्तेचे लचके तोडतात, मात्र केंद्र सरकार ला दोष देताना एक होतात असाही आरोप फडणवीस यांनी केला. एवढंच नाही तर उद्या यांना यांच्या बायकोने मारले तरीही ते मोदींनाच दोष देतील असा खोचक टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
हे वाचलं का?
खडसे, मुंडे, तावडे, बावनकुळे या OBC नेत्यांचा राजकीय बळी का घेतला? रोहिणी खडसेंनी उपस्थित केला प्रश्न
ओबीसी समाजाला राजकीय आरक्षण मिळावं म्हणून भाजपने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन पुकारलं आहे. बीड, नागपूर, बार्शी, चंद्रपूर, जळगाव, कोल्हापूर, हिंगोली, बारामती, अहमदनगर, ठाणे, मुंबई, यवतमाळ, सांगली, अकोला यासह प्रमुख शहरांमध्ये आंदोलन सुरू आहे. भाजपने या आंदोलनाची घोषणा तीन दिवसांपूर्वीच केली होती. महाराष्ट्र सरकारने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण संपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
एवढंच नाही तर राज्य सरकारला प्रत्येक गोष्ट मोदी सरकारवर ढकलायची सवयच लागली आहे. इम्पेरिकल डेटाचा मोदी सरकारशी काही संबंध नाही. तरीही या सरकारमधले मंत्री मोदी सरकारकडे बोट दाखवत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT