ठाकरे सरकारच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा मुहूर्त योग्य वेळी सांगणार- देवेंद्र फडणवीस
ठाकरे सरकारच्या करेक्ट कार्यक्रमाचा मुहूर्त योग्य वेळी जाहीर करेन असं आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे काही मंत्री, काही नेते यांचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. केंद्र सरकारने दिलं नाही आणि केंद्र सरकारने केलं नाही यापैकी एक वाक्य म्हणायचं हे त्यांचं ठरलेलं असतं. महाराष्ट्राच्या जनतेला गोंधळात टाकण्याचं काम या सरकारचे नेते करत आहेत. […]
ADVERTISEMENT
ठाकरे सरकारच्या करेक्ट कार्यक्रमाचा मुहूर्त योग्य वेळी जाहीर करेन असं आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. आपल्याकडे काही मंत्री, काही नेते यांचं स्क्रिप्ट लिहिलेलं आहे. केंद्र सरकारने दिलं नाही आणि केंद्र सरकारने केलं नाही यापैकी एक वाक्य म्हणायचं हे त्यांचं ठरलेलं असतं. महाराष्ट्राच्या जनतेला गोंधळात टाकण्याचं काम या सरकारचे नेते करत आहेत. त्यांना सगळं माहित आहे तरीही ते जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टी करत आहेत. खोटं बोल पण रेटून बोल हे राज्य सरकारचं धोरण आहे.
ADVERTISEMENT
Cyclone Tautkae : देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेला केलं महत्त्वाचं आवाहन, म्हणाले…
चक्रीवादळामुळे राज्यात बरंच नुकसान झालं आहे. केंद्र सरकारकडून सगळ्या राज्यांना मदत केली जाणार आहे. मासेमारी करणारे हवालदिल झाले आहेत. त्यांच्या बोटी वाहून गेल्या आहेत. त्यांना राज्य सरकारने तातडीने मदत केली पाहिजे. केंद्र सरकार हे सगळ्या राज्यांना मदत करणारच आहे. राज्य सरकारने तातडीने मदत केली पाहिजे त्यांना हे शक्य आहे तरीही ते केंद्र सरकार मदत करत नाही असा कांगावा करत आहेत. अनेकांच्या बोटी वाहून गेल्या आहेत. काल मी जो कोकणाचा दौरा केला तेव्हा सगळ्यांचं हेच म्हणणं होतं की निसर्ग चक्रीवादळाच्या वेळी जी काही मदत जाहीर केली होती ती मदतच अजून केलेली नाही. कोळी बांधवांना जी मदत जाहीर केली होती ती देखील योग्य प्रकारे मिळाली नाही. त्यांना नुकसान भरपाई मिळाली नाही. अनेक लोकांची घरं वाहून गेली होती मात्र त्यांनाही मदत मिळाली होती.
हे वाचलं का?
Corona: मोदी सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समन्वय आहे का? फडणवीस म्हणतात..
आता दुसरं चक्रीवादळ आलं त्याचं नुकसान सर्वदूर झालं नसलं तरीही ज्या भागात नुकसान झालं आहे ते मोठ्या प्रमाणावर झालं आहे. जर सरकारने खुल्या दिलाने मदत केली तर या लोकांचे हाल थोडे कमी होतील. जेव्हा घोषणा केली जाते तेव्हा वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे त्यानंतर मदत जाहीर केली पाहिजे. सांगली, कोल्हापूरमध्ये पूर आला होता तेव्हा आम्ही तिथे जाऊन तिथला आढावा घेतला. त्यानंतर मदत जाहीर केली. जिल्हाधिकाऱ्यांकडून या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावाही केला जाणं आवश्यक गरजेचं आहे असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे. ठाकरे सरकारने मदत केली नाही तर या सरकारला तोंड दाखवायला जागा उरणार नाही असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT