आज पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण… जाणून घ्या काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
आज पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्यात मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पहिलं तिकिट मोदीजींनी काढलं आहे. विक्रमी वेळात महामेट्रोने या मेट्रोचं काम पूर्ण केलं आहे. एक नवा आदर्श पुणे मेट्रोने घालून दिला आहे. असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. आज जायकाच्या प्रकल्पाचं उद्घाटन होतं […]
ADVERTISEMENT
आज पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कारण आज पुण्यात मेट्रो धावली आहे. या मेट्रोचं पहिलं तिकिट मोदीजींनी काढलं आहे. विक्रमी वेळात महामेट्रोने या मेट्रोचं काम पूर्ण केलं आहे. एक नवा आदर्श पुणे मेट्रोने घालून दिला आहे. असं म्हणत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
ADVERTISEMENT
आज जायकाच्या प्रकल्पाचं उद्घाटन होतं आहे. त्यामुळे स्वच्छ नदी आपल्याला पाहण्यास मिळणार आहे. इलेक्ट्रिक बसेस सुरू होणार आहे. एक पैशाचंही प्रदूषणही महापालिकेच्या माध्यमातून होणार नाही. महापालिकेने केलेली कामं उत्तम आहेत. ही सगळी कामं पूर्ण होऊ शकली कारण पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे महापालिकेला पाठिंबा दिला आहे. एक चांगलं शहर म्हणून पुणे उदयास येईल याबाबत माझ्या मनात काहीच शंका नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
आज दिवस पुण्याचा स्वप्नपूर्तीचा दिवस.. आज पुण्याची मेट्रो धावली, याचं पहिलं तिकीट मोदींनी मोबाईलवर पेमेंट करुन काढलं.. आम्ही विदाऊट तिकीट यात्रा केलीये तर मेट्रोवाल्यांना सांगणार की नंतर आमच्याकडून वसून करुन घ्या.. अनेक अडचणी होत्या.. पण महामेट्रोचं अभिनंदन..महामेट्रोनं विक्रमी वेळात पुणे मेट्रोचं काम केलंय.
हे वाचलं का?
पुणे मेट्रोचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपलं मनोगत व्यक्त करत नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करून मी बोलायला सुरूवात करतो आहे. तसंच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनाही अभिवादन करतो आहे, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाला सुरूवात केली आहे.
ADVERTISEMENT
PM Modi in pune : गरवारे ते आनंदनगर… ‘पुणे मेट्रो’मधून पंतप्रधान मोदींचा प्रवास
ADVERTISEMENT
पुणे महापालिका आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आल्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोचं लोकार्पण करण्यात आलं. गरवारे स्थानकात हा कार्यक्रम पार पडल्यानंतर मोदींनी पुणे मेट्रोतून प्रवासही केला.
पुण्यातील नागरी वाहतुकीसाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणारा हा प्रकल्प आहे. २४ डिसेंबर २०१६ रोजी पंतप्रधानांच्या हस्तेच या प्रकल्पाची पायाभरणी करण्यात आली होती. एकूण ३२.२ किमी लांबीच्या पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या १२ किमी लांब मार्गाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं आहे. हा संपूर्ण प्रकल्प ११,४०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून उभारला जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT