Nagpur मधले निर्बंध शिथील करा, देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र

मुंबई तक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं आहे. नागपूरमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आता इथले निर्बंध उठवले जावेत अशी मागणी फडणवीस यांनी या पत्रात केली आहे. नागपुरातील कोरोना संसर्गाचे लक्षणीयरित्या कमी झालेले प्रमाण, विविध छोटे व्यवसायी आणि दुकानदारांची हलाखीची स्थिती, वाढत असलेला रोष पाहता नागपुरात निर्बंधांमध्ये […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक पत्र लिहिलं आहे. नागपूरमधील कोरोना संसर्गाचं प्रमाण कमी झालं आहे त्यामुळे आता इथले निर्बंध उठवले जावेत अशी मागणी फडणवीस यांनी या पत्रात केली आहे.

काय म्हटलं आहे फडणवीस यांनी?

नागपुरातील कोरोना संसर्गाचे प्रमाण आता लक्षणीयरित्या कमी झालेले आहे. सातत्याच्या लॉकडॉऊनमुळे आधीच विविध छोटे व्यावसायिक आणि दुकानदारांची स्थिती हलाखीची झाली असल्याने आता स्थिती सुधारत असताना त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. त्यामुळे नागपुरात निर्बंधांमध्ये तातडीने शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील ज्या भागात कोरोनाचे प्रमाण अत्यल्प आहे आणि आता स्थिती बर्‍याच अंशी सुधारली आहे, तेथे लागू असलेल्या कठोर निर्बंधांबाबत फेरविचार करून त्यात तातडीने शिथिलता देण्याची गरज आहे. अर्थकारण आणि आरोग्य यात सुवर्णमध्य साधतच आपल्याला कोरोनावर मात करावी लागेल.