एक असे पोलीस महासंचालक जे करतात लोकल ट्रेनने प्रवास!

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: एखादा IPS अधिकारी म्हटलं की, त्याच्यासोबत मोठा लवाजमा असतो. शासकीय बंगला, गाडी, सुरक्षा रक्षक असंच बरंच काही या अधिकाऱ्यांच्या दिमतीला असतं. खरं तर त्यांच्या कामाचं स्वरुप लक्षात घेता या सगळ्या गोष्टी मिळणं हे योग्यच आहे. पण जेव्हा थेट महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक (DGP) हे स्वत: दररोज लोकल ट्रेनने प्रवास करतात असं आपल्याला कुणी सांगितलं तर? खरं तर आपल्याला यावर विश्वास बसणार नाही. पण नुकतंच ज्यांच्याकडे राज्याच्या पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक पदाचा कार्यभार सोपविण्यात आाला आहे असे IPS अधिकारी संजय पांडे हे गेल्या तीन वर्षांपासून मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करत असल्याचं समोर आलं आहे.

ADVERTISEMENT

वरिष्ठ संपादक अनिल कुमार सिंग यांनी याबाबतची एक पोस्ट आणि फोटो फेसबुकवर शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, डीजीपी संजय पांडे हे गेल्या तीन वर्षापासून मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करत आहेत. वकील इजाज नक्वी यांचासोबतचा हा फाटो आहे. ज्यामध्ये महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक आपल्याला दिसतायेत.

खरं तर याआधी देखील स्वच्छ चारित्र्याचे आयपीएस अधिकारी म्हणून संजय पांडे यांची ओळख होती. मात्र, त्यांच्या साधेपणाची देखील पोलीस खात्यात नेहमीच चांगल्या अर्थाने चर्चा व्हायची.

हे वाचलं का?

मुंबई पोलिसांमधील नाराजी चव्हाट्यावर ! उद्धव ठाकरेंवर नाराज असलेले संजय पांडे सुट्टीवर

काही दिवसांपूर्वी मुंबईतील आयपीएस अधिकाऱ्यांच्या ज्या बदल्या करण्यात आल्या त्यानंतर संजय पांडे यांनी काहीशी नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी आपल्याला योग्य पोस्टिंग मिळत नसल्याचं मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात नमूद केलं केलं होतं. त्यानंतर शुक्रवार (9 एप्रिल) त्यांच्याकडे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार सोपविण्यात आल्याचं अधिकृत परिपत्रकाद्वारे जाहीर करण्यात आलं.

ADVERTISEMENT

संजय पांडेंनी सांगितलेलं कशी होते हप्ता वसुली, आमिर खानची ‘ती’ क्लिप व्हायरल

ADVERTISEMENT

दरम्यान, अभिनेता आमीर खानच्या ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमातील एका वक्तव्यानंतर संजय पांडे हे खूपच चर्चेत आले होते. ज्यामध्ये त्यांनी पोलिसांच्या हप्ता वसुलीवर भाष्य केलं होतं.

सत्यमेव जयते कार्यक्रमात दरवेळेस नवनवे सामाजिक मुद्दे घेऊन त्याविषयी सविस्तरपणे चर्चा केली जायची. अशाच एका एपिसोडमध्ये आयपीएस अधिकारी संजय पांडे हे देखील हजर होते. यावेळी ते पोलिसांकडून घेतली जाणारी लाच याबाबत बोलले होते.

VIRAL VIDEO: IPS ने सांगितलं कशी होते हप्ता वसुली, आमिर खानची ‘ती’ क्लिप व्हायरल

आमिर खानचा प्रश्न: ‘आपल्याला नेहमी असं दृश्य दिसतं की, पोलीस किंवा कॉन्स्टेबल ते अनेकदा रस्त्यावर किंवा कोपऱ्यात जाऊन लाच घेततात. मग तो सामान्य माणूस असो किंवा ऑटो रिक्षा चालक… पोलीस कमी कमवतोय पण यामुळे त्याची कमाई मात्र चांगली असली पाहिजे.’

संजय पांडे यांचं उत्तर: ‘तो करत असलेली कमाई ही जर त्याच्यापुरती मर्यादीत असती तर ही गोष्ट मान्य करायला हरकत नाही. तो बिचारा सगळी कमाई आपल्या घरी घेऊन जात असेल असा मला विश्वास नाही. आपण सगळे लोकशाहीमध्ये राहत आहोत. प्रत्येक व्यक्तीच्या वर कुणी तरी आहे. वरिष्ठ (Seniors) असतात. सीनयर्सचे देखील सीनयर्स असतात आणि त्यानंतर आपले राजकीय नेते आहेत. ही संपूर्ण साखळी आहे.

आमिर खानचा प्रश्न: हे लोकं दुकानदारांकडून देखील हप्ते घेतात. तर आपलं म्हणणं आहे की, हा पैसा इतर ठिकाणी देखील जातो?

संजय पांडे यांचं उत्तर: ‘ही गोष्ट मी आपल्याला समजावतो. सामान्य नागरिकाला समजेल अशा प्रकारचे दोन भष्ट्राचार असल्याचं मी मानतो. एक आहे असंघटीत प्रकार. म्हणजे… आपण रस्त्याने जात असताना आपल्याला विचारलं जातं की, आपलं लायसन्स कुठे आहे? आपण म्हणता की नाहीए काही अॅडजस्ट करुयात… तर अॅडजस्ट होतं. हा प्रकार असंघटीत आहे. म्हणजे आपल्याला माहित नाही की, किती लोक पकडले जातील आणि किती लोक असे असतील जे आज 10 रुपये देतील, उद्या 50 रुपये देतील, परवा 25 रुपये देतील. तर हे असंघटीत आहे.’

‘पण काही गोष्टी या खूप ठरवून म्हणजे संघटीतपणे आखून दिलेल्या आहेत. जसं की, आपल्याकडे रेस्टॉरंट आहेत, FL-3 लायसन्स आहेत. लिकर बार आहेत. महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात डान्स बार आहेत. ज्यावर बंदी देखील लावण्यात आली होती. कुठे-कुठे अजूनही चालू असतील. त्यामुळे हे संघटीत सेटलमेंट, इंस्टिट्यूशनल कलेक्शन आहे ते जरा वेगळं आहे. जास्तीत जास्त डिस्ट्रिब्यूशन जे होतं… बजेटरी एस्टिमेशन जवळ-जवळ सगळ्यांना माहित असतं. जसं आपल्याकडे एवढे रेस्टॉरंट आहेत. ही एक पूर्ण सिस्टम बनली आहे.’ असं संजय पांडे यांनी म्हटलं.

याचाच अर्थ मोठ्या संजय पांडे यांनी असं स्पष्ट केलं होतं की, पोलीस खात्यातून मोठ्या प्रमाणात पैशांची वसुली केली जाते.

दरम्यान, परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटींच्या वसुलीच्या आरोपानंतर सत्यमेव जयते मधील हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT