धाराशिव साखर कारखान्यात राज्यातला पहिला ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या महाराष्ट्रातली परिस्थिती अजुनही नियंत्रणात आलेली नाही. अनेक महत्वाच्या शहरांमध्ये रुग्णांवर उपचार करण्यासाठी ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. राज्यात गेल्या काही दिवसांपासून ऐरणीवर आलेला ऑक्सिजन तुटवड्याचा प्रश्न चांगलाच गाजतो आहे. या पार्श्वभूमीवर धाराशिव साखर कारखान्यात इथेनॉल प्रकल्पातून ऑक्सिजन निर्मितीचा पायलट प्रोजेक्ट हाती घेण्यात येणार आहे. साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

मुंबईत 12 रुग्णालयांमध्ये हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाची लवकरच उभारणी

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांनी ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलं होतं. यानंतर वसंतदादा इन्स्टिट्यूटमध्ये २३ एप्रिल रोजी व्हर्च्युअल बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली एक बैठक पार पडली. या बैठकीत ऑक्सिजन निर्मितीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.

हे वाचलं का?

यवतमाळ : दारु न मिळाल्यामुळे सॅनिटायजर प्यायलं, ७ जणांचा मृत्यू

धाराशिव साखर कारखाना प्रतिदिन १६ ते २० टन ऑक्सिजनची निर्मिती करणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरनम अभिजीत पाटील यांनी दिली. यासाठी लागणाऱ्या आवश्यक त्या परवानग्या राज्य सरकारकडून त्वरित मिळणार असल्याची माहितीही अभिजीत पाटील यांनी दिली. या बैठकीत ज्या साखर कारखान्यांमध्ये इथेनॉल प्रकल्प सुरु आहेत…त्यांनी आपल्या प्रकल्पात बदल करुन अतिरीक्त सामग्रीमध्ये मॉलेक्युलर सिव्ह वापरुन ऑक्सिजन निर्मितीचे प्रकल्प मोठ्या प्रमाणात राबवण्याबाबत चर्चा झाली.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT