बच्चू कडूंचं रवी राणांना आव्हान! “५० आमदारांना खरंच खोके दिले का? शिंदे फडणवीसांनी स्पष्ट करावं”

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भाजपला पाठिंबा देणारे आमदार रवी राणा आणि अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्यातला संघर्ष तीव्र होण्याची चिन्हं आहेत. कारण बच्चू कडू यांनी आता थेट शिंदे फडणवीसांनाच वादात ओढलं आहे. ५० आमदारांना खरंच खोके दिले का? हे शिंदे फडणवीसांनीच स्पष्ट करावं असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

ADVERTISEMENT

काय म्हटलं आहे बच्चू कडू यांनी?

सत्तेवर लाथ मारणारा माझ्या सारख्या स्वाभिमानी माणूस असले आरोप सहन करणार नाही. त्यामुळे मी राणा यांच्यावर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. आरोप सिद्ध करावेत नाहीतर माफी मागावी, त्यांना जशाच तसे उत्तर देऊ असा जोरदार पलटवार बच्चू कडून यांनी केला आहे.

रवी राणांमुळे मीच नाही तर ५० आमदार नाराज

रवी राणा यांच्यामुळे केवळ मीच नाही तर सगळे ५० आमदार नाराज झाले आहेत. अनेकांनी मला फोन करुन याबाबत त्यांची भूमिका मांडली. राणा यांचे आरोप हे खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही शिंतोडे उडवणारे आहेत असंही बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणांना समज द्यावी

रवी राणा हे देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्या जवळचे आहोत असं सांगत असतात. त्यामुळे त्यांचा आरोपांमागे कुणाची फूस तर नाही ना अशी शंका येऊ लागली आहे. त्यामुळे आता वेळ आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांसमोर या आरोपांबाबत स्पष्टीकरण देण्याची आणि स्टंटबाज रवी राणा यांना समज देण्याची मागणी

माझे आजपर्यंतचे राजकारण हे कायम संघर्षाचे राहिले आहे. सत्ताधा-यांविरोधात राहिले आहे. मला सत्तेचा मोह कधीच नव्हता आणि नाही. मंत्रीपद मिळो अथवा न मिळो. असले खोटे आरोप मी कधीही सहन करणार नाही. अत्यंत गरिबीतून आणि काबाड कष्ट करुन मी माझ्या जनतेच्या पाठिंब्याच्या जोरावर चार वेळा आमदार झालो आहे. जनतेनं दिलेल्या या पुण्याईवर जर कोणी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा प्रयत्न केला तर ते सहन केलं जाणार नाही. त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवंद्र फडणवीस यांना विनंती आहे की त्यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करवी. जेणेकरून हे आरोपांचे मभळ दूर होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. ते मला योग्य तो न्याय देतील अशी अपेक्षा आहे असंही बच्चू कडूंनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT