रामायणातील सीता फेम दिपिका चिखलिया झाली ट्रोल, शाळेचा ड्रेस,हातात वाईनचा ग्लास असलेला फोटो पोस्ट केल्याने झाली टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रामानंद सागर यांनी १९८७ मध्ये दूरदर्शनवर दर रविवारी रामायण मालिका सुरू केली आणि ती सुरू असताना रस्तेही सुनसान व्हायचे. इतकी ती लोकप्रिय झाली. लाॅकडाऊन काळात तिचं पुन्हा प्रसारण केलं गेलं. तेव्हाही प्रेक्षकांनी ती पाहिली. अरुण गोविल राम म्हणून जितके लोकप्रिय झाले, तितकीच दीपिका चिखलिया सीता म्हणून. अर्थात, हे कलाकार आपापल्या भूमिका तन्मयतेनं करत होते. पण आजही प्रेक्षक त्यांना त्या भूमिकेतून बाहेर काढायला तयार नाहीत.

ADVERTISEMENT

दीपिका चिखलिया सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिनं तिच्या सोशल मीडियावर दोन मैत्रिणींसोबत एक फोटो शेअर केला होता. त्यात ती शाळेतल्या ड्रेसमध्ये आहे. पूर्ण हाताचा पांढरा शर्ट, गळ्यात टाय आणि निळ्या रंगाचा स्कर्ट अशा अवतारात तिनं तो फोटो शेअर केला. शिवाय पायात स्पोर्ट शूज, हातात ड्रिंक आणि एक कॅप्शन लिहिली. रविवारीही जातोय शाळेत, अशी ती कॅप्शन आहे. त्यावर दीपिका खूप ट्रोल झालीय. नंतर तिनं ही पोस्ट डिलीट केली.

या फोटोंवर दीपिकाच्या चाहत्यांनी टीका केली. त्यांना हा फोटो काही आवडला नाही. वेगवेगळ्या कमेंट आल्या. एकानं लिहिलं, ‘हा तुमचा कोणाता अवतार आहे? तुम्हाला अजिबातच चांगला दिसत नाहीय.’ तर दुसऱ्या युझर्सनं लिहिलं, ‘माँ, तुमच्या हातात कोणतं ड्रिंक आहे ? ‘ तर आणखी एकानं लिहिलंय, ‘ तुम्ही असे कपडे घालू नका. तुम्हाला आम्ही देवीचा दर्जा दिलाय.’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT