भाजपात धुसफूस.., मोहिते-पाटील भाकरी फिरवणार का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

disagreement between bjp leaders in madha and dispute between nimbalkar and mohite patil on the surface
disagreement between bjp leaders in madha and dispute between nimbalkar and mohite patil on the surface
social share
google news

माढा: माढा लोकसभा मतदारसंघांचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि मोहिते-पाटील परिवारात दिवसेंदिवस दरी वाढताना दिसत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेलां सुप्त संघर्ष अखेर आज चव्हाट्यावर आला. आजपासून तीन दिवस अकलूजमध्ये ताराराणी महिला केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातील आमदार आणि विविध पक्षातील मान्यवरांची नावे निमंत्रण पत्रिकेत टाकण्यात आली आहेत, मात्र ज्या तालुक्यात कार्यक्रम आहे त्या माळशिरस तालुक्याचे भाजपचे आमदार राम सातपुते, माढा लोकसभा मतदार संघांचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर याचं नाव पत्रिकेत टाकण्यात आलं नाही. (disagreement between bjp leaders in madha and dispute between nimbalkar and mohite patil on the surface)

ADVERTISEMENT

त्यांची उपस्थिती ही कार्यक्रमाला नसल्याने मोहिते-पाटील आणि त्यांनीच निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीमधील मतभेद टोकाला गेल्याचे बोललं जात आहे. असं असताना मात्र फलटणमधून खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे विरोधक रामराजे नाईक निंबाळकर यांचे बंधू संजीवबाबा नाईक निंबाळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमास उपस्थिती होते.

माढा मतदारसंघात भाजपमध्ये धुसफूस

संजीवबाबा निंबाळकर यांचे नाव माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून उमेदवार म्हणून चर्चेत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील यांच्या मनात नक्की काय चाललं आहे. याबाबत अनेक चर्चा राजकीय वर्तुळत सुरु असून यावेळी मोहिते-पाटील भाकरी फिरवणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच बरोबर निमंत्रण पत्रिकेत नावे असणारे भाजपचे व मित्र पक्षाचे लोकप्रतिधिनीही या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याने चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये सोलापूर भाजपचे जिल्हा अध्यक्ष आमदार सचिन कलशेट्टी, भाजपचे माजी विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक, शिवसेनेचे आमदार शहाजी बापू पाटील, भाजपचे आमदार समाधान अवताडे या बड्या नेत्यांनीही पाठ फिरवल्याचे चित्र पाहायला मिळाले.

हे वाचलं का?

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर

 

एकेकाळी मोहिते-पाटलांचा बालेकिल्ला असणारा माढा लोकसभा मतदारसंघ विजयसिंह मोहिते पाटील स्टँडिंग खासदार असताना हा मतदार संघ रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना सोडण्यात आला व रणजितसिंह नाईक-निंबाळकर मोठ्या मताधिक्याने निवडूनही आले या विजयामध्ये मोहिते पाटील परिवाराचा सिंहाचा वाटा होता. मात्र त्यानंतर एका विधानपरिषदेशिवाय मोहिते-पाटील यांना काहीच मिळालं नाही. तेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना कायम लाल दिव्याची गाडी मोहिते पाटील यांच्या दारात होती.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >> Ajit Pawar: अजितदादा पुन्हा नाराज?, शरद पवारांच्या ऐतिहासिक घोषणेवेळी होते गैरहजर

राज्याचे नेते म्हूणन त्यांना ओळखलं ज्यायचं मात्र भाजपमध्ये आल्यापासून मोहिते-पाटलांना त्यांच्या तोलांमोलाचं पद मिळालं नाही. शिवाय अनेक कार्यक्रमाचे उदघाटन खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मोहिते पाटीलंशिवाय केले. त्यामध्ये प्रामुख्याने ज्या जलशक्ती मंत्रालयाची घोषणा मोहिते पाटील यांच्या प्रवेशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती त्या जलशक्ती मंत्रालयाचे मंत्री सोलापूरमध्ये आले असता मोहिते-पाटील उपस्थिती नव्हते. त्यातच रणजितसिंह मोहिते-पाटील यांना माढा लोकसभा मतदार संघात उमेदवारी मिळावी अशी मागणी सोशल मीडियावर कार्यकर्ते करताना दिसत आहेत.

ADVERTISEMENT

हे ही वाचा >>  शिर्डी हादरलं! सख्ख्या भावानेच केली अल्पवयीन बहिणीची निर्घृण हत्या

त्यामुळे मोहिते पाटलांच्या मनात नक्की काय चाललं आहे. मोहिते-पाटील माढा लोकसभेची भाकरी फिरवणार का? मोहिते पाटलांचं हे धक्कातंत्र कोणाच्या पथ्यावर पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT