दिशा सालियनची 8 जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली, नारायण राणेंचा पुन्हा आरोप
दिशा सालियनची ८ जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली. दिशा सालियनला त्या पार्टीला जाण्याची इच्छा नव्हती. तिचा पोस्टपॉर्टेम रिपोर्ट का आलेला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीतल्या रजिस्ट्ररचं ८ जूनचं पान का फाडण्यात आलं? असे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. दिशा सालियन सोबत जे काही घडलं ते सुशांतला समजलं […]
ADVERTISEMENT
दिशा सालियनची ८ जूनला बलात्कार करून हत्या करण्यात आली. दिशा सालियनला त्या पार्टीला जाण्याची इच्छा नव्हती. तिचा पोस्टपॉर्टेम रिपोर्ट का आलेला नाही? दिशा सालियन ज्या इमारतीत राहायची त्या इमारतीतल्या रजिस्ट्ररचं ८ जूनचं पान का फाडण्यात आलं? असे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपस्थित केले आहेत. दिशा सालियन सोबत जे काही घडलं ते सुशांतला समजलं होतं. त्याच्यासोबत काही लोकांचा वाद झाला त्यानंतर त्याची हत्या करण्यात आली आणि आत्महत्या केल्याचं भासवण्यात आलं असाही आरोप नारायण राणेंनी केला.
ADVERTISEMENT
सुशांत सिंगच्या घरात कोण गेलं होतं? सुशांत सिंगच्या इमारतीतले सीसीटीव्ही कोणी गायब केले? तरूण कलाकाराची हत्या कुणी केली? कोणत्या मंत्र्याची गाडी तेव्हा उभी होती? विशिष्ट अँब्युलन्स कशी आली? सगळे पुरावे कुणी नष्ट केले? असे सगळे प्रश्न नारायण राणेंनी आज पत्रकार परिषदेत उपस्थित केले आहेत.
एवढंच नाही तर ज्या बंगल्याची नोटीस मला पाठवण्यात आली आहे, त्याला काहीही अर्थ नाही. उगाच दुश्मनी काढली जाते आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या हयातीत तो प्लॉट मी घेतला आहे. आम्हाला राजकारण कुणीही शिकवू नये असंही नारायण राणे म्हणाले आहे. महाराष्ट्रात शेतकऱ्याची अवस्था आहे? स्वतः काही बोलत नाही. कुणीतरी चिनपाट खासदार आहे तो बोलत असतो. मराठी माणसासाठी शिवसेना असा नारा दिला जातो होता तो मराठी माणूस आज हद्दपार झाला आहे असंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
हे वाचलं का?
सुशांतच्या आत्महत्याप्रकरणात नारायण राणे यांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेतलं आहे. तसेच मातोश्रीवरील चार जणांविरोधात ईडीची नोटीस तयार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आता हे चार जण कोण आहेत, याबद्दल चर्चा सुरू झाली आहे. आधीच शिवसेना आणि नारायण राणे यांच्यात सुरू असलेला वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे. आजच मुंबई महानगरपालिकेने नारायण राणे यांना अनधिकृत बांधकामाप्रकरणी नोटीस बजावली होती आणि आजच राणेंनी विनायक राऊतांचं सुशांतसिंहच्या आत्महत्येप्रकरणी नाव घेतलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT