डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा सर्वर हॅक, १ कोटी ५१ लाखांची रोकड हॅकरकडून लंपास
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या डोंबिवली येथील शाखेचा सर्वर हॅक करुन १ कोटी ५१ लाख रुपये लंपास झाले आहेत. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक विभाग प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मानपाडा पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल करुन घेत हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एका […]
ADVERTISEMENT
डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या डोंबिवली येथील शाखेचा सर्वर हॅक करुन १ कोटी ५१ लाख रुपये लंपास झाले आहेत. हा प्रकार बँकेच्या निदर्शनास येताच संगणक विभाग प्रमुख राईलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ADVERTISEMENT
मानपाडा पोलिसांनी घडलेल्या प्रकाराबद्दल तक्रार दाखल करुन घेत हा गुन्हा सायबर पोलिसांकडे वर्ग केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एका हॅकरने डोंबिवली नागरी बँकेचा सर्व्हर असलेल्या नवी मुंबई महापे येथील सर्व्हर कक्षात ऑनलाइन पद्धतीने संपर्क केला.
यानंतर त्या हॅकरने बँकेचे खाते हॅक करून किंवा बँकेच्या डेटामध्ये फेरफार करून बँकेची सुमारे १ कोटी ५१ लाख रुपयांची रक्कम परस्पर काढून घेतली. हा प्रकार लक्षात येताच पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून सायबर पोलिसांकडे हा गुन्हा वर्ग केला असून या घटनेचा अधिक तपास सुरु केला आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT