मासिक पाळीत प्रमाणापेक्षा जास्त रक्तस्त्राव होतो? तर…
मासिक पाळी ही महिलांसाठी नैसर्गिक प्रक्रिया आहे. परंतु, काही स्त्रियांना त्या वेळी जास्त रक्तस्त्राव होतो. त्या या गोष्टींकडे दुर्लक्ष करतात. पण याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
ADVERTISEMENT
Connection Between Thyroid and Menstruation : महिलांना मासिक पाळी येणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. यावेळी पोटात दुखणे, मुरड येणे अस्वस्थपणा वाटणे या सर्व गोष्टी सामान्य आहेत. पण, काही महिलांना त्यावेळी अधिक त्रास होतो ज्यावेळी जास्त रक्तस्त्राव होतो. स्त्रिया या गोष्टींकडे अनेकदा दुर्लक्ष करतात. पण याचे गंभीर परिणाम उद्भवू शकतात. अनियमित पाळी येणे आणि या स्थितीत अधिक रक्तस्त्राव होणे हे थायरॉईडच्या समस्येचे लक्षण देखील असू शकते. (Do not ignore excessive menstrual bleeding it can be a sign of thyroid disease)
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, 4.2 कोटी भारतीयांना थायरॉईड आहे. यामुळे मासिक पाळीतून थायरॉईडची लक्षणं दिसत असतील तर, आधीच यावर उपचार घेता येईल.
फासावर लटकवणार का? जितेंद्र आव्हाडांच्या संतापाचा कडेलोट, तरुणाईला हाक
थायरॉईड आणि मासिक पाळीमधील कनेक्शन कोणते?
थायरॉईड आणि मासिक पाळीबाबत तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितलं की, ‘आपल्याकडे थायरॉईड ग्रंथी आहेत ज्या हार्मोन्स तयार करतात. ते शरीरातील मेटाबॉलिज्म आणि मासिक पाळी नियमित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. थायरॉईड हार्मोन्स ट्रायओडोथायरोनिन (T3) आणि थायरॉक्सिन (T4) या दोन मुख्य ग्रंथी तयार करते. जे प्रजनन प्रणालीवर परिणाम करतात. ते इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनच्या उत्पादनावर परिणाम करतात जे मासिक पाळी संतुलित करण्यासाठी जबाबदार असतात. जेव्हा थायरॉईड ग्रंथी नीट काम करत नाही तेव्हा एकतर शरीर खूप जास्त थायरॉईड हार्मोन्स तयार किंवा कमी करते. ज्यावेळी जास्त थायरॉईड हार्मोन्स तयार होतात त्याला हायपरथायरॉईडीझम नावाचे लक्षण म्हणून ओळखले जाते. तसेच, जर शरीरात थायरॉईड हार्मोन्स खूप कमी झाले तर त्याला हायपोथायरॉईडीझम असे म्हणतात.’
हे वाचलं का?
वासनांध बायकोचं नवऱ्यासोबत भयंकर कृत्य.. नेमकं घडलं तरी काय?
थायरॉईडमुळे मासिक पाळीत होतात अडचणी
हायपोथायरॉईडीझमच्या अनियमिततेमुळे जास्त रक्तस्त्रावाच्या समस्या उद्भवतात. महिलांना पाळीत अडचणी येतात. कधी लवकर तर कधी उशिरा पाळी येऊ शकते. हायपोथायरॉईडीझम पॉलिसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोमचे कारण बनू शकते. यामुळे अनियमित मासिक पाळी, मूल न होणे, लठ्ठपणा यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. हायपरथायरॉईडीझममुळे शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते ज्यामुळे निरोगी मासिक पाळीसाठी आवश्यक असलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉनची पातळी कमी होते.
Viral Love Letter : महिलेने बॉयफ्रेंडचं 18 वर्ष जुनं Love लेटर केलं शेअर, अन्…
मासिक पाळीत होणारा जास्त रक्तस्त्राव कसा कमी करावा?
पाळीमध्ये होणारा जास्त रक्तस्त्राव रोखण्यासाठी व्हिटॅमीन-ई खूप फायदेशीर ठरते. यासाठी पाळी सुरू होण्याच्या दोन दिवस आधीपासूनच व्हिटॅमीन-ई चे सेवन सुरू करा. तसेच, पाळीमध्ये कोणतेही औषध घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT