आधार कार्ड देणं टाळा, मास्क्ड आधार द्या; केंद्राकडून नागरिकांना सावधानतेचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तुम्हीही, मागितलं जाईल तिथे आधार कार्डची झेरॉक्स देता? मग तुमची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. हो, असं केंद्र सरकारनेच म्हटलंय. केंद्राने यासंदर्भात सावधानतेचा इशारा दिला असून, संपूर्ण नंबर दिसणाऱ्या आधार कार्डची फोटो कॉपी संस्था वा इतर ठिकाणी न देण्याचं आवाहन केलंय.

ADVERTISEMENT

खासगी असो वा सरकारी, प्रत्येक ठिकाणी आधार कार्डची झेरॉक्स प्रत मागितली जाते. मात्र, याचा गैरवापर होण्याची शक्यता आहे. तशी भीती केंद्र सरकारनेच व्यक्त केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने नागरिकांना संपूर्ण आधार नंबर दिसणाऱ्या आधारची झेरॉक्स कोणतीही संस्थेला न देण्याचा इशारा दिला आहे.

केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान विभागातंर्गत येणाऱ्या युआयडीएआयने यासंदर्भात एक निवेदन प्रसिद्ध केलं आहे. नागरिकांनी पुर्ण आधार नंबर असलेल्या आधार कार्डची प्रत कोणत्याही संस्थेला देऊ नये. कारण त्याचा गैरवापर होऊ शकतो. त्याऐवजी मास्क्ड आधारचा वापर करावा, असं सरकारनं म्हटलं आहे.

हे वाचलं का?

केंद्र सरकारने आधार कार्ड ऐवजी मास्क्ड आधार (Masked Aadhar) वापरण्यास सांगितलं आहे. आधार कार्डवर नागरिकाचा संपुर्ण आधार कार्ड दिलेला आहे. तर मास्क्ड आधार कार्डवर आधार नंबरचे शेवटचे चार अंकच दिसतात. मास्क्ड आधार नागरिक ऑनलाईन डाऊनलोड करता येतं.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारची परवानगी नसलेल्या खासगी संस्था नागरिकांचं आधार कार्ड घेऊ शकत नाही. त्याचबरोबर त्यांच्याकडे ठेवू शकत नाही, असंही केंद्राने या निवेदनात स्पष्ट केलं आहे. यात विना परवाना हॉटेल्स, चित्रपटगृहे यांचा समावेश आहे. युआयडीएआयकडून आधार वापराचा परवाना मिळालेल्या खासगी संस्थाच नागरिकांकडून आधार घेऊ शकतात, असंही केंद्रान स्पष्ट केलं आहे.

ADVERTISEMENT

केंद्र सरकारने आधार कार्ड सार्वजनिक ठिकाणच्या कम्प्युटरवरून वा सायबर कॅफेत डाऊनलोड करू नये, असं म्हटलं आहे. जर अशा ठिकाणी आधार कार्ड डाऊनलोड केलं, तर ते कायमस्वरूपी त्या संगणकावरून डिलीट करावं. केंद्र सरकारच्या अनेक योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अनिवार्य असून, यामाध्यमातून डिजिटल पेमेंटही करता येतं.

mAadhaar आहे सुरक्षित पर्याय

युआयडीएआयने स्मार्टफोन वापरकर्त्यांसाठी मोबाईल अॅप विकसित केलेलं आहे. mAadhaar असं या अॅपचं नाव असून, ते प्ले स्टोअर आणि अॅपलच्या अॅप स्टोरवरून डाऊनलोड करता येऊ शकतं. यामुळे नागरिकांची आधारची माहिती सुरक्षित राहावी यासाठी विशेष फिचरही जोडलेलं आहे. एका आधार नंबरवर हे आधार अॅप एकाच फोनवर सुरू राहत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT