अकोल्यात किती रूग्ण पॉझिटिव्ह? वर्ध्यात काय आहे स्थिती?
अकोल्यात ३०५ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्याचीही चिंता वाढली आहे. आज संध्याकाळी ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ११ महिला व ५९ पुरुषांचा समावेश आहे. तेल्हारा येथील दहा, जीएमसी व हिवरखेड येथील प्रत्येकी सहा, केडिया प्लॉट येथील चार, डाबकी रोड, तापडिया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, अनीकट, शास्त्रीनगर, खदान, रामदासपेठ, […]
ADVERTISEMENT
अकोल्यात ३०५ रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे अकोल्याचीही चिंता वाढली आहे. आज संध्याकाळी ७० जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये ११ महिला व ५९ पुरुषांचा समावेश आहे.
ADVERTISEMENT
तेल्हारा येथील दहा, जीएमसी व हिवरखेड येथील प्रत्येकी सहा, केडिया प्लॉट येथील चार, डाबकी रोड, तापडिया नगर व मोठी उमरी येथील प्रत्येकी तीन, खोलेश्वर, अनीकट, शास्त्रीनगर, खदान, रामदासपेठ, केशवनगर, थार व कारला येथील प्रत्येकी दोन, तर उर्वरित किर्ती नगर, अकोट फाइल, पोळा चौक, मोहम्मद अली चौक, पंचशील नगर, बाळापूर नाका, सुधीर कॉलनी, चांदुर ,भिमनगर, केला प्लॉट, सल्पी, कोठारी बाजार, गुरुदेव नगर ,महाकाली नगर ,रजपुतपुरा, रतनलाल प्लॉट, भांबेरी, शिवर व शिवणी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे. आज ३२१ जणांना अकोल्यात डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज अकोल्यात कोरोनाची बाधा होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे.
वर्ध्यात किती रूग्ण पॉझिटिव्ह?
हे वाचलं का?
वर्धा शहरात आज १५६१ चाचण्या झाल्या. त्यापैकी १९१ जण कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तर १७८ जण कोरोना मुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधिकांची एकूण संख्या १३ हजार ९८७ इतकी झाली आहे. यापैकी १२ हजार ५७७ जण हे आत्तापर्यंत कोरोनातू बरे झाले आहेत. तर आजपर्यंत एकूण ३७१ जणांचा मृत्यू झाला आहे. आज घडीला वर्ध्यात १ हजार ३९ अॅक्टिव्ह केसेस आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT