डोंबिवली : बोगस चेकद्वारे खातेधारकांचे पैसे उडवणारी टोळी गजाआड

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

– मिथीलेश गुप्ता, डोंबिवली प्रतिनिधी

ADVERTISEMENT

एका कंपनीच्या नावाने बोगस चेक तयार करून बँकेला २४ कोटींचा गंडा घालण्याचा प्रयत्न उघडकीस आला आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी अशा बोगस चेकद्वारे खातेधारकांचे पैसे उडवणाऱ्या टोळीतील ७ जणांना गजाआड करण्यात आले आहे.

सचिन प्रकाश साळस्कर (वय २९, रा. विरार), उमर फारूक (वय ३९, रा. विरार), अनेक अनिल ओतारी (वय ३३, रा. विरार), मजहर मोहम्मद हुसेन खान (वय ४०, रा. विरार), हरिश्चंद्र काशिनाथ कडव (रा. वांगणी), नितीन दिलीप शेलार ( वय 40, रा. वांगणी) आणि अशोक बिहारीराम चौधरी (वय ५१, रा. महेश अपार्टमेंट, गोग्रासवाडी, नामदेव पथ, डोंबिवली-पूर्व) अशी या सात आरोपींची नावं आहेत. यातील सचिन साळस्कर, उमर फारूक आणि अनेक ओतारी या तिघांना कल्याण कोर्टाने ६ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. तर उर्वरित चौघांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी कल्याणच्या आधारवाडी तुरूंगात करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

कल्याण-शिळ मार्गावरील एका बँकेच्या शाखेचे मॅनेजर विशाल व्यास यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. सातही आरोपींनी इंडस टॉवर प्रा. लिमीटेड कंपनीच्या नावाने २४ कोटींचा बोगस चेक तयार करत बँकेत टाकला. यावेळी बँक मॅनेजर विशाल व्यास यांना सहीच्या ठिकाणी थोडीशी खाडाखोड झाल्याचं दिसलं. मोठी रक्कम असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी इंडस कंपनीशी संपर्क साधला असता अशाप्रकारे कोणताही चेक देण्यात आलेला नसल्याचं समोर आलं. यानंतर त्यांनी मानपाडा पोलिसांत तक्रार दाखल केली.

काय होती या टोळीची कार्यपद्धती?

ADVERTISEMENT

अटक करण्यात आलेले सातही आरोपी टीमवर्कने काम करायचे. यात खातेधारकांचे बँक डिटेल्स गोळा करणे, त्यावर असणारा बॅलन्स, खातेधारकाच्या सहीचे फोटो, इत्यादी माहिती घेतली जायची. त्यानंतर या माहितीच्या आधारे बोगस चेक बनवण्याचे काम केलं जायचं. एक साधा चेक घेऊन त्यावरील खात्याचा नंबर खोडून, नवीन खात्याचा नंबर प्रिंट केला जायचा. यानंतर हे आरोपी जमविलेल्या माहितीच्या आधारे त्यावर डुप्लिकेट सही करायचे. यानंतर हा चेक वापरून अकाऊंट टू अकाऊंट पैसे पाठविले जात असत. पैसे ट्रान्सफर करून घेण्यासाठी देखील डमी अकाऊंटचाच वापर केला जायचा. अशाप्रकारे आतापर्यंत या आरोपींनी ५० पेक्षा जास्त बोगस चेक बनविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या सात जणांनी मिळून आतापर्यंत कित्ती कंपन्या, बँका आणि व्यक्तींची अशारितीने फसवणूक केली आहे याचा सहायक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण गोरे अधिक तपास करत आहेत.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT