करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली भोंदूबाबाने 33 वर्षीय महिलेकडून उकळले तब्बल 32 लाख रुपये!
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: कळव्यात राहणाऱ्या एका महिलेला एका भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात कळव्यातल्या खारीगाव येथील बाली रेसिडेन्सीत राहणाऱ्या प्रियांका योगेश राणे (वय 33 वर्ष) या गृहिणीने […]
ADVERTISEMENT
मिथिलेश गुप्ता, डोंबिवली: कळव्यात राहणाऱ्या एका महिलेला एका भोंदूबाबाने करणीची बाधा काढण्याच्या नावाखाली तब्बल 32 लाख 15 हजार 875 रुपयांचा गंडा घातल्याची घटना डोंबिवलीत समोर आली आहे. डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आता तक्रारही दाखल करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
या संदर्भात कळव्यातल्या खारीगाव येथील बाली रेसिडेन्सीत राहणाऱ्या प्रियांका योगेश राणे (वय 33 वर्ष) या गृहिणीने डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार पोलिसांनी जळगाव जिल्ह्यातल्या भडगावातील गंजेवाडा-शनि चौकात राहणारा पवन पाटील नामक इसमाच्या विरोधात भादंवि कलम 420, 406, महाराष्ट्र नरबळी आणि इतर अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध करण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन अधिनियम 2013 चे कलम 2 (1), (ख), 3 (1), (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर 2019 पासून आजतागायत पवन बापूराव पाटील (28) या जळगाव जिल्ह्यातील गंजेवाड्यात राहणाऱ्या भोंदूबाबाने तक्रारदार प्रियांका राणे यांच्यासह डोंबिवली पूर्वेकडील न्यू आयरे रोडला असलेल्या ओम साई सोसायटीत राहणाऱ्या त्यांच्या आईचीही फसवणूक केली आहे.
हे वाचलं का?
प्रियांका यांच्यासह त्यांचा भाऊ आणि आईला भोंदूबाबा पवन याने आपल्या अंगात सप्तश्रृंगीदेवी संचारत असल्याचे भासवले. साऱ्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी या भोंदूबाबाने स्वत:च्या हातातून कधी खडीसाखर, कधी कुंकू व त्यामध्ये सप्तश्रृंगी देवीच्या चांदीची प्रतिमा काढून दाखवली. तसेच या बाबाने प्रियांका यांच्यावर कुणीतरी करणी केल्याची भीती घातली.
करणी काढण्यासाठी खर्च करावा लागणार असल्याचे सांगून या बाबाने प्रियांका व त्यांच्या आईच्या खात्यामधून वेळोवेळी स्वत:च्या बँक खात्यामध्ये तब्बल 31 लाख 6 हजार 874 रूपये इतके पैसे ऑनलाईनद्वारे ट्रान्स्फर करवून घेतले.
ADVERTISEMENT
तसेच त्यांच्याकडून 1 लाख 9 हजार रुपये किंमतीच्या भेटवस्तूही घेतल्या. अशाप्रकारे या पवन पाटील याने 32 लाख 15 हजार 874 रुपयांची फसवणूक केली.
ADVERTISEMENT
आजार बरा करण्यासाठी महिलेकडे शारिरिक संबंधाची मागणी, गुप्तांगाचे फोटो पाठवणारा भोंदूबाबा अटकेत
याप्रकरणी आपला विश्वासघात केल्याचा आरोप प्रियांका राणे यांनी त्यांच्या तक्रारीत केला आहे. त्यामुळे आता पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपी पवन पाटील याला अटक करण्याची कारवाई सुरु केली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT