डोंबिवली: रजिस्ट्रेशन केलं पण लस न घेताच तरुण पळून गेला, नेमकं प्रकरण काय?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

डोंबिवली: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर सरकारने नियम कडक करताना कोरोना लसीचे दोन डोस घेणे बंधनकारक केलं आहे. मात्र अनेकजण यातही पळवाट शोधण्याचा प्रयत्न करत असल्याने तिसरी लाट रोखण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. गुरुवार (23 डिसेंबर) डोंबिवलीत 29 वर्षीय युवक लसीकरणासाठी नोंदणी करून लस न घेताच पळून गेल्याची घटना घडली आहे.

ADVERTISEMENT

जेव्हा आरोग्य विभागाच्या हा प्रकार लक्षात आला तेव्हापासून आरोग्यविभाग या तरुणाचा सलग शोध घेत आहे. मात्र, अद्याप तरी संबंधित तरुण आरोग्य विभागाला सापडू शकलेला नाही.

डोंबिवली पूर्वेतील नेहरू मैदानात पालिकेच्या वतीने लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. गुरुवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास या केंद्रावर लस घेण्यासाठी आलेल्या ऋषिकेश मोरे या 29 वर्षीय तरूणाने दुसऱ्या डोससाठी रजिस्ट्रेशन केले मात्र त्यांनतर तो लस न घेताच निघून जाऊ लागला.

हे वाचलं का?

सेंटरवरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी ऋषिकेशला थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने स्वच्छतागृहात जाऊन येण्याचा बहाणा केला. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याला लस टोचून घेतल्यानंतर स्वच्छतागृहात जाण्यास सांगितले. पण कर्मचाऱ्यांचं काहीही न ऐकता ऋषिकेश चक्क पळून जाऊ लागला.

यामुळे सेंटरवर असलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण ता दोघांनाही ढकलून देत लस न घेताच ऋषिकेश तिथून पळून गेला. पहिला डोस घेतलेला असतानाही दुसरा डोस न घेता ऋषिकेश का पळून गेला याचाचं सगळ्यांना आश्चर्य वाटत आहे.

ADVERTISEMENT

दुसरीकडे सेंटरवर जो काही प्रकार घडला त्या प्रकाराबाबत कर्मचाऱ्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबतची माहिती दिली. यावेळी वरिष्ठांनी याबाबत बोलताना अशी माहिती दिली की, सदर व्यक्तीला शोधून काढून त्याचे लसीकरण केले जाणार आहे.

ADVERTISEMENT

दुसरा डोस असतानाही त्याने लस घेण्यास टाळाटाळ केल्याने पहिला डोस देखील त्याने घेतला आहे की, केवळ कागदोपत्री नोंद करून प्रमाणपत्र मिळवले आहे असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे?

महाराष्ट्राच्या चिंतेत भर! एकाच दिवसात आढळले ‘ओमिक्रॉन’चे 23 रूग्ण

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 23 नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉन व्हेरिएंट असलेल्या महाराष्ट्रातल्या एकूण रूग्णांची संख्या 88 झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता वाढली आहे. 23 पैकी 22 रूग्णांचा अहवाल राष्ट्रीय विज्ञान संस्थेने तर एक रूग्णाचा अहवाल राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेने दिला आहे.

Covid 19: पुन्हा लॉकडाऊन?… जिथे Omicron व्हेरिएंट फोफावला, तिथे नेमका काय निर्णय?

वर्षाच्या सुरुवातीला तिसरी लाट येण्याची शक्यता आहे

राष्ट्रीय कोव्हिड-19 सुपरमॉडेल समितीचे सदस्य विद्यासागर यांनी एएनआयला सांगितले की, ‘पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारतात तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. तथापि, लोकांमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रतिकारशक्ती निर्माण झाल्यामुळे ती दुसऱ्या लाटेपेक्षा काहीशी कमकुवत असेल, परंतु तिसरी लाट नक्कीच येईल.’

‘एप्रिल-मेमध्ये दुसऱ्या लाटेतील रुग्णांच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत त्याची संख्या कमी असेल. सरकारने 1 मार्चपासून भारतात लसीकरण सुरू केले होते. डेल्टा व्हेरिएंट देखील याच वेळेस भारतात आला होता. त्यावेळी फ्रंटलाईन वर्कर्स वगळता कोणालाही लस देण्यात आली नव्हती. त्यामुळेच डेल्टाने मोठ्या प्रमाणात लोकांना संक्रमित केलं होतं.’

विद्यासागर म्हणाले, ‘आता देशात 75 ते 80 टक्के सीरो-प्रेवलेन्स आहे. 85% लोकांना पहिला डोस मिळाला आहे आणि 55% लोकांना लसीचे दोन्ही डोस मिळाले आहेत. जे या साथरोगापासून 95% संरक्षण करते. त्यामुळे तिसऱ्या लाटेत तेवढ्या प्रमाणात रुग्ण समोर येणार नाहीत जेवढे दुसऱ्या लाटेत पाहायला मिळाले होते. तसेच दुसऱ्या लाटेच्या अनुभवातून आपण आपली क्षमताही निर्माण केली आहे. त्यामुळे आम्ही कोणत्याही अडचणीशिवाय त्याचा सामना करू शकतो.’

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT