महाविकास आघाडीच्या नेत्यांचा सुपडा साफ, कृष्णा सहकारी कारखान्यात अतुल भोसलेंच्या पॅनलची बाजी
सातारा येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनलने दणदणती विजय मिळवत सर्व २१ जागांवर बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा कारखान्याचा ताबा मिळवण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांचे कारखाना ताब्यात घेण्याचे प्रयत्न या निवडणूकीत अपुरे पडले […]
ADVERTISEMENT
सातारा येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजप नेते डॉ. अतुल भोसलेंच्या सहकार पॅनलने दणदणती विजय मिळवत सर्व २१ जागांवर बाजी मारली आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्णा कारखान्याचा ताबा मिळवण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांचा या निवडणुकीत सुपडा साफ झाला आहे. पृथ्वीराज चव्हाण आणि विश्वजीत कदम यांचे कारखाना ताब्यात घेण्याचे प्रयत्न या निवडणूकीत अपुरे पडले आहेत.
ADVERTISEMENT
सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या साखर कारखान्याची सत्ता मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारमधले नेते प्रयत्नशील होते. परंतू मतमोजणीत पहिल्यापासून डॉ. अतुल भोसलेंच्या पॅनलने आघाडी घेत महाविकास आघाडीच्या पॅनलला जवळपासही फिरकू दिलं नाही. ४७ हजार १४५ सभासद असलेल्या कारखान्यात डॉ. अतुल भोसलेंच्या पॅनलने बाजी मारत पुन्हा एकदा सत्ता आपल्याकडेच राखली आहे.
या निवडणुकीत अतुल भोसलेंच्या पॅनलला मिळालेलं मताधिक्य हे साखर कारखान्याच्या निवडणुकांच्या इतिहासातलं सर्वाधिक मताधिक्य मानलं जात आहे. कारखान्याची सत्ता भोसले गटाकडून दुसऱ्या गटाकडे जावी यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी खूप प्रयत्न केले, परंतू त्यांचे हे प्रयत्न अखेरीस तोकडेच पडले आहेत. कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीनिमित्त कृष्णा सहकारी साखर कारखाना राजकारणाचा अड्डा बनवण्याचे षडयंत्र अनेक राजकारण्यांचं होतं मात्र सुज्ञ सभासदांनी तो डाव उधळून लावला असून यापुढील काळात शेतकरी सभासदांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी काम करणार असल्याची प्रतिक्रिया विजयानंतर डॉ. अतुल भोसले यांनी दिली.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT