कोरोनावरच्या ‘बारामती पॅटर्न’ औषधाची आंतराराष्ट्रीय पातळीवर दखल

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बारामतीच्या डॉक्टरांनी हळद आणि काळीमिरी यांच्या मिश्रणातून तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधनात्मक औषधाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. या औषधाच्या वापराने कोरोनाग्रस्त रूग्णांवर उपचार होऊ शकतात. त्याचप्रमाणे कोरोनामुळे शरीरावर होणारे दुरगामी परिणाम टाळता येऊ शकतात. हळदीमध्ये आढळणारा ‘करक्युमीन’ हा पोषक घटक व काळी मिरी यांचं मिश्रणातून हे औषध बनवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

बारामतीच्या डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहूल मस्तूद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या संदर्भात केलेलं संशोधन आंतरराष्ट्रीय पातळीवरील जर्नल फ्रंटियर्स इन फार्माकॉलॉजी यामध्ये (Frontiers in Pharmacology) प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

या संदर्भात डॉ. कीर्ती पवार यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितलं की, “बारामती इथल्या सार्वजनिक रुग्णालयात इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांची मान्यता मिळाल्यानंतर करक्युमीन या औषधाची क्लिनीकल ट्रायल 140 रुग्णांवर घेण्यात आली. यामध्ये सौम्य लक्षणं, मध्यम तसंच गंभीर स्वरूपाची लक्षणं असलेल्या रुग्णांचा समप्रमाणात सहभाग होता.”

हे वाचलं का?

रुग्णालयात दाखल होताना रुग्णांची शरीरात असलेली ऑक्सिजनची पातळी यावरून कोरोनाबाधित रुग्णांची सौम्य, मध्यम आणि तीव्र लक्षणांमध्ये विभागणी करण्यात आली. अशा रुग्णांच्या एका गटाला कोव्हिड टास्क फोर्सने निर्देशित केलेली ओषधं देण्यात आली. तर दुसऱ्या गटाला कोव्हिड टास्क फोर्सने निर्देशित औषधांसोबत करक्युमीन 525 एमजी आणि बायोपेरीन अडीच एमजी (म्हणजे हळद व काळी मिरी याचं योग्य मिश्रण असलेलं) हे औषध दिवसातून दोन वेळा देण्यात आलं.

या निरीक्षणांमधून खालील निष्कर्ष समोर आले-

ADVERTISEMENT

– करक्युमीन आणि बायोपेरीन यांच्या मिश्रणयुक्त गोळ्या दिलेल्या रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणं ही लक्षणं कमी होऊन रुग्ण लवकर बरे झाले

ADVERTISEMENT

– हे औषध घेणा-या रुग्णांमधील गंभीरतेचं प्रमाण खूप कमी झाले

– हे औषध न दिलेल्या रुग्णांचा बरा होण्याचा कालावधी 7 ते 27 दिवस होता तर करक्युमीन घेतलेल्या रुग्णांचा 5 ते 10 दिवस होता.

– करक्युमीन घेतलेल्या रुग्णांना ऑक्सिजन लावण्याची गरज कमी भासली. तसंच कृत्रिम श्वसनाचं मशीन लावण्याची गरजही कमी झाली.

– रुग्णालयात दाखल होताना मध्यम लक्षणं असलेल्या रुग्णांना रेमडेसिवीरची गरज कमी लागली.

– मध्यम त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाच्या रुग्णांमधील मृत्युदर कमी झाला.

– रक्त पातळ करणाऱ्या हेपॅरिन या इंजेक्शन बरोबर करक्युमीन दिल्यास फायदा होतो. शिवाय याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

– या हळदीच्या गोळीमुळे रक्त न गोठता प्रवाही राहण्यास मदत होते. परिणामी कोव्हीडमुळे फुफ्फुसावर होणारे दुष्परिणाम, ह्रदयाच्या, फुफ्फुसाच्या आणि शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये होणाऱ्या गुठळ्या असे घातक दुष्परिणाम टाळण्यास मोठ्या प्रमाणावर मदत झाली.

– कोव्हिड होऊन गेल्यावरही पुढील 3 महिने या गोळीचा मर्यादित स्वरूपात वापर करून कोव्हिडमुळे होणारे दुरगामी परिणाम (Thrombo – embolic complications) टाळण्यासाठी मदत होऊ शकते. याचा शास्त्रीय पुरावा या संशोधनदवारे मांडण्यात आला.

डॉ. कीर्ती पवार, डॉ. राहुल मस्तूद, डॉ. सतीश पवार, सम्राज्ञी पवार, डॉ. रमेश भोईटे, डॉ. राहुल भोईटे, डॉ मीनल कुलकर्णी आणि संख्याशास्त्रज्ञ आदिती देशपांडे यांच्या टीमने केलेलं हे संशोधन औषधशास्त्रातील प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झालंय. यामुळे भारतातीलच नाही जगभरातील कोव्हीड रुग्णांमधील उपचारासाठी मदत होणार आहे. या संशोधनामुळे शासकीय व वैदयकीययंत्रणेवरील ताण कमी होण्यास मोलाचं योगदान मिळू शकतं. करक्युमीन आणि बायोपेरीन यांचं मिश्रण असलेली गोळी यु.एस.एफ.डी.ए मान्यताप्राप्त आहे. ही गोळी कोणत्याही औषधाच्या दुकानात उपलब्ध आहे. कोव्हिड होऊ नये म्हणून रोज एक गोळी घेतल्यास त्याचा प्रतिबंधात्मक उपयोग होऊ शकतो.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT