डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी उद्घाटन केलेली विहिर अजूनही शासकीय निधीच्या प्रतीक्षेत
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती आहे. दरम्यान डॉ. आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहिर आणि परिसर सुशोभीकरणासाठी अजूनही सरकारी निधीच्या प्रतिक्षेत आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे १९३७ पूर्वी दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक विहिर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधली. त्याच सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची […]
ADVERTISEMENT
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची आज 130वी जयंती आहे. दरम्यान डॉ. आंबेडकर यांनी उद्घाटन केलेली पाणी पुरवठ्याची ऐतिहासिक सार्वजनिक विहिर आणि परिसर सुशोभीकरणासाठी अजूनही सरकारी निधीच्या प्रतिक्षेत आहे.
ADVERTISEMENT
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे १९३७ पूर्वी दलित बांधवांनी स्वतःच्या वस्तीसाठी स्वतंत्र सार्वजनिक विहिर श्रमदान आणि लोकवर्गणीतून बांधली. त्याच सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोलापूर जिल्ह्यात येणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे जोपर्यंत बाबासाहेब आंबेडकर वळसंगला येऊन आडाच्या पाण्याला स्पर्श करीत नाहीत तोपर्यंत आडाचे पाणी कोणीही प्यायचं नाही असा पण इथल्या दलित बांधवांनी केला होता.
अखेर तत्कालीन सामाजिक कार्यकर्ते भुजंगप्पा रुई ,तेजप्पा वाघमारे, ओंकारी गायकवाड, विजय गायकवाड यांच्या प्रयत्नातून २४ एप्रिल १९३७ रोजी बाबासाहेब आंबेडकर वळसंग येथे आले. वळसंग हे गाव पुर्वीपासून सामाजिक सलोखा जोपासणारे गाव म्हणून ओळखले जाते. स्वातंत्रसैनिक कै.गुरुसिध्दप्पा अंटद यांनी स्वत:ची बैलगाडी बाबासाहेबांच्या मिरवणूसाठी उपलब्ध करून दिली.
हे वाचलं का?
मिरवणूकीनंतर बाबासाहेबांनी आडाचे पाणी शेंदून प्यायलं होतं. तेव्हापासून आजही येथील बांधव याच आडाचे पाणी पिण्यासाठी वापरतात. सोलापूर शहरानंतर जिल्ह्यात सर्वात मोठी भीमजयंती येथे साजरी केली जाते. परगावी पोटापाण्यासाठी गेलेले भिमसैनिक आवर्जून १४ एप्रिलला गावाकडे येतात.
दरम्यान सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी या स्थळाला भेट देऊन निधी देण्याची घोषणा केलीये. मात्र अजूनही कागदी घोडे पुढे सरकले नाहीत असं चित्र आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT