मुंबईत आज Vaccination बंद राहणार, एकाही सरकारी केंद्रावर मिळणार नाही लस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबईत आज दिवसभर Vaccination बंद राहणार आहे एकाही केंद्रावर लस मिळणार नाही. मुंबई महापालिकेने ट्विट करून ही माहिती दिली आहे. महापालिकेच्या किंवा सरकारी केंद्रावर लस मिळणार नाही असं मुंबई महापालिकेने म्हटलं आहे. मुंबईला लसींचा तुटवडा भासतो आहे. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे असं समजतं आहे. महाराष्ट्रासह देशभरात जानेवारी महिन्याच्या मध्यापासून लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

ADVERTISEMENT

मुंबईतील Haji Ali दर्ग्याची लसीकरण केंद्रासाठी जागा देण्याची तयारी

सुरूवातीच्या टप्प्यांमध्ये फ्रंटलाईन वर्कर्स, कोरोना योद्धे, आरोग्य कर्मचारी अशा सगळ्यांना लस देण्यात आली. दुसरा टप्पा ज्येष्ठ नागरिकांसाठी होता. त्यानंतर 1 एप्रिलपासून 45 वर्षे आणि त्यापुढील सर्वांना लस देण्यास सुरूवात झाली. तर 1 मे पासून 18 ते 44 या वयोगटासाठीही लसीकरण मोहीम सुरू झाली. मात्र 1 मे रोजी सुरू झालेली 18 ते 44 या वयोगटाची लसीकरण मोहीम तूर्तास स्थगित करण्यात आली आहे. कारण या वयोगटासाठी लसीच उपलब्ध नाहीत. 45 वर्षे आणि त्यापुढील वयोगटाच्या लोकांना लसीचा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यालाच महाराष्ट्राने प्राधान्य दिलं आहे. अशात लसींचा तुटवडा राज्यात मोठ्या प्रमाणावर भासतो आहे.

हे वाचलं का?

थेट लसीकरण केंद्रावर जाऊन घेता येणार लस, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय

दरम्यान आज मुंबईतल्या एकाही सरकारी आणि महापालिकेच्या लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही असं ट्विट मुंबई महापालिकेने केलं आहे मात्र लसीकरण का होणार नाही याचं कारण मात्र त्यांनी दिलेलं नाही. अशात ANI या वृत्तसंस्थेने मात्र लसी उपलब्ध होणार नसल्याने लसीकरण बंद राहणार असल्याचं म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

जून महिन्यात सिरम इन्स्टिट्युट दहा कोटी डोसेस केंद्राला पुरवणार आहे तसंच कोव्हॅक्सिन म्हणजेच भारत बायोटेकच्या लसीचेही डोस केंद्राला पुरवले जाणार आहेत. त्यामुळे लसीकरणाला वेग मिळू शकतो. तूर्तास तरी मुंबईतलं लसीकरण आज दिवसभर बंद ठेवण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT