खासदार नवनीत राणा पतीसोबत बाईकवर… लोक म्हणाले, ‘हेल्मेट…?’
अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता नुकताच, नवनीत राणा आणि पती रवी राणा यांचा होळीपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मेळघाटातील हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. त्यामध्ये नवनीत राणा पती रवी राणासोबत बाईकवर बसलेल्या दिसत आहेत. बाईकने ते दोघं शेतात आणि जंगलातून […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अमरावती जिल्ह्यातील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात.
हे वाचलं का?
आता नुकताच, नवनीत राणा आणि पती रवी राणा यांचा होळीपूर्वीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
ADVERTISEMENT
मेळघाटातील हा व्हिडीओ त्यांनी पोस्ट केला आहे. त्यामध्ये नवनीत राणा पती रवी राणासोबत बाईकवर बसलेल्या दिसत आहेत.
ADVERTISEMENT
बाईकने ते दोघं शेतात आणि जंगलातून फेरफटका मारताना दिसत आहेत.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिलं, ‘पूर्ण 5 दिवस मेळघाट भागातील आदिवासी बांधवांसोबत होळी साजरी करण्यासाठी टू व्हीलरवरून गावोगावी फिरत असताना आणि समस्या ऐकत असताना…’
पण, यावेळी दोघांनीही हेल्मेट घातलं नव्हतं. यावर लोकांनी त्यांना ट्रोल केलं आहे.
एका युजरने म्हटलं, ‘ना हेल्मेट, ना नंबर प्लेट.. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला पाहिजे?’
दुसऱ्या यूजरने लिहिलं, ‘रवी राणा आणि नवनीत राणा यांनी हेल्मेट तर घातलंच नव्हतं. यासोबत पाठीमागून येणाऱ्या ताफ्याच्या गाडीतही लोक खिडकीबाहेर लटकत होते.’
यासोबतच अनेक व्हिडीओही नवनीत राणांनी शेअर केले आहेत. ज्यामध्ये त्या आदिवासींसोबत डान्स करताना दिसल्या.
नवनीत जेव्हा आदिवासी गाण्यांच्या तालावर नाचत होत्या तेव्हा त्यांच्याभोवती इतर लोकही नाचत होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT