फेसबुक-इन्स्टावर Paid Verification पैसे लागणार का?
Meta Verified लाँच केले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta seo mark Zuckerberg ) यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. हे कंपनीचे सबस्क्रिप्शन मॉडेल ( subscription model of company ) आहे, ज्यासाठी मार्क झुकरबर्गने सांगितले आहे की (spending 1 thousand rupees for every month) वापरकर्त्यांना दरमहा सुमारे 1,000 रुपये शुल्क द्यावे लागेल. फेसबुक आणि […]
ADVERTISEMENT
Meta Verified लाँच केले आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग (Meta seo mark Zuckerberg ) यांनी एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. हे कंपनीचे सबस्क्रिप्शन मॉडेल ( subscription model of company ) आहे, ज्यासाठी मार्क झुकरबर्गने सांगितले आहे की (spending 1 thousand rupees for every month) वापरकर्त्यांना दरमहा सुमारे 1,000 रुपये शुल्क द्यावे लागेल. फेसबुक आणि इन्स्टाग्रामसाठी हे शुल्क आकारण्यात येणार आहे. Paid subscription for blue tick
ADVERTISEMENT
Twitter blue tic : पैसे देऊन अशी मिळवा ‘ब्ल्यू टिक’
मात्र, आता अनेकांच्या मनात हा प्रश्न उपस्थित होत आहे की, फेसबुक किंवा इन्स्टाग्राम चालवणे आता मोफत मिळणार नाही का? सतत कोणत्या शुल्काबद्दल बोलले जात आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे यात आपण पाहुयात. तुम्हाला आठवत असेल की अलीकडेच ट्विटरने ब्लू सबस्क्रिप्शनची घोषणा केली होती. यासह, वापरकर्ते चार्ज घेऊन अतिरिक्त फायदे घेऊ शकतात. यामध्ये नावासमोर ब्लू टिक किंवा व्हेरिफाईड बॅज मिळणे हा सर्वात मोठा फायदा आहे. बरेच लोक याकडे स्टेटस सिम्बॉल म्हणून पाहतात. त्याचाच फायदा आता कंपन्या घेत आहेत.
हे वाचलं का?
मस्कने ट्विटरपासून सुरुवात केली
आतापर्यंत फेसबुक-इन्स्टाग्राम किंवा ट्विटरवर केवळ प्रसिद्ध लोकांनाच ब्लू टिक दिली जात होती. हे खात्याची शुद्धता दर्शवते. मात्र यात बदल करताना मस्कने कंपनीचा सबस्क्रिप्शन प्लॅन घेणाऱ्यांना ब्लू टिक द्या असे सांगितले.
फेसबुकवर पण ब्लू टिकसाठी चार्जेस
आता Meta ने देखील असाच एक प्लान जाहीर केला आहे. याच्या मदतीने युजर्स पैसे देऊन ब्लू टिक मिळवू शकतात. मात्र, यासाठी त्यांना सरकारने जारी केलेले ओळखपत्रही दाखवावे लागणार आहे. हे सध्या ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये सादर करण्यात आले आहे. यासाठी कंपनी सुमारे एक हजार रुपये आकारत आहे. यामुळे बनावट अकाऊंटशी लढण्यास मदत होईल, असे कंपनीने म्हटले आहे. पैसे भरल्यानंतर आणि ओळखपत्राची पडताळणी केल्यानंतर, वापरकर्त्याच्या नावासमोर निळ्या रंगाची टिक दिसेल. यामुळे इतरांना अस्सल खाते ओळखणे कठीण होणार नाही. येत्या काळात ते भारतातही लॉन्च केले जाईल.
ADVERTISEMENT
ट्विटर ब्लूमध्ये नवे बदल; डीपी बदलल्यास ब्लू टिक जाणार, एडिटच्या पर्यायासह इतर सुविधा, पण…
ADVERTISEMENT
फेसबुक-इन्स्टाग्राम वापरायला फ्री मिळणार नाही का?
सशुल्क सेवा अद्याप भारतात आलेली नाही परंतु काही आठवड्यांत ती देशातही सुरू होऊ शकते. व्हेरिफाईड सशुल्क सेवा सुरू केल्यानंतरही, तुम्ही पूर्वीप्रमाणेच फेसबुक-इन्स्टाग्राम मोफत वापरण्यास सक्षम असाल. त्यावर निळा बॅज मिळवण्यासाठी तुम्हाला शुल्क भरावे लागेल. तुम्ही कोणतेही शुल्क भरले नाही तरीही हे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी पूर्वीप्रमाणेच मोफत राहतील.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT