पूर्वी भूमिपूजन व्हायचं पण उद्घाटन कधी होईल याची शाश्वती नव्हती, मोदींचा काँग्रेसला टोला

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

2014 च्या पूर्वी देशात प्रकल्पांचं भूमिपूजन व्हायचं पण उद्घाटन आणि लोकार्पण कधी होईल ते ठाऊक नसायचं. आता ती व्यवस्था नाही. आम्ही वेळेत काम पूर्ण करू शकतो हे भाजपच्या सरकारने मेट्रोच्या रूपाने दाखवून दिलंय. असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. पुणे मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात त्यांनी हा टोला लगावला आहे.

ADVERTISEMENT

PM Modi in pune : गरवारे ते आनंदनगर… ‘पुणे मेट्रो’मधून पंतप्रधान मोदींचा प्रवास

छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतीराव फुले अनेक महान व्यक्तीमत्वांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यनगरीच्या रहिवाशांना माझा नमस्कार असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणाला सुरूवात केली. पुणे मेट्रोचं उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आलं त्यावेळी त्यांनी मराठीतून पुणेकरांशी संवाद साधला. या वर्षात आपण स्वातंत्र्यांचा 75 वा उत्सव साजरा करत आहोत. लोकमान्य टिळक, गोपाळ गणेश आगरकर, गोपाळकृष्ण गोखले, महादेव रानडे यांच्यासारख्या सर्व स्वातंत्र्यसैनिकांना मी अभिवादन करतो असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

आज पुणेकरांच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे कारण… जाणून घ्या काय म्हणाले देवेंद्र फडणवीस

आज महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पण करणाऱ्या रामभाऊ म्हाळगी यांची पुण्यतिथी आहे. त्याचप्रमाणे मी बाबासाहेब पुरंदरे यांचीही आठवण येते आहे. काही वेळापूर्वीच मी छत्रपती शिवरायांच्या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मला लाभलं. त्यांची प्रतिमा कायम आमच्या मनात असते. येणाऱ्या पिढीला ते प्रेरणा देत राहतील. आज पुण्याशी संबंधित अनेक प्रकल्पाचं उद्घाटन आणि भूमिपूजन करण्यात आलं. आधी भूमिपूजन व्हायचं पण माहितच नसायचं की उद्घाटन होणार माहित नसायचं. आम्ही आज संदेश दिला आहे की वेळेवर कामं पूर्ण करून त्याचं उद्घाटन केलं जाऊ शकतो. मुळा-मुठा नदीच्या स्वच्छतेसाठीही काम केलं जातं आहे.

ADVERTISEMENT

बाणेरमध्ये ई बस सेवा सुरू करण्यात आली आहे. आज पुणेकरांना खास गिफ्ट मिळालं आहे ते आहे आर. के. लक्ष्मण यांना समर्पित असलेलं एक म्युझियमही मिळालं आहे. सगळ्या पुणेकरांचं मी अभिनंदन करतो. आमच्या दोन्ही महापौरांना मी वेगाने विकास करण्यासाठी शुभेच्छा देतो असंही मोदींनी म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

पुणे हे शहर सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि राष्ट्रभक्तीसाठी ओळखलं जातं. तसंच हे विद्येचं माहेरघर आहे. आयटी क्षेत्रातही पुणे मागे नाही. अशात आधुनिक सेवा ही पुणेकरांची खरी गरज आहे. त्यामुळेच आमचं सरकार अनेक आघाड्यावर काम करतं आहे. काही वेळापूर्वीच मी मेट्रोमध्ये प्रवास केला. पुणेकरांसाठी ही मेट्रो खूपच उपयोगी ठरणार आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पुणे मेट्रो लवकर पूर्ण व्हावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. कोरोनाचं संकट येऊनही एक सेक्शन आज तयार झालं आहे. पुणे मेट्रोसाठी सोलार पावरचाही उपयोग होतो आहे. त्यामुळे दरवर्षी 25 हजार टन कार्बनडायऑक्साईड हवेत मिसळणं थांबणार आहे. पुणे मेट्रोसाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेलं योगदान खरोखर खूप मोठं आहे.

आपल्या देशात वेगाने शहरीकरण होतं आहे ते आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे. 2030 पर्यंत आपली शहरी जनसंख्या ६० कोटीच्या पुढे जाऊ शकते. शहरांची वाढती लोकसंख्या ही अनेक संधी उपलब्ध करून देते पण काही आव्हानंही निर्माण होतात. फ्लायओव्हर तयार करायचे असतील त्यासाठी एक अवधी असतो. रस्ते किती मोठे करायचे त्यालाही मर्यादा आहेत. त्यावेळी एकच उपाय उरतो तो म्हणजे मास ट्रान्सपोर्टेशन. त्यावरच आमचं सरकार आता भर देतो आहे.

2014 मध्ये दिल्लीच्या NCR मध्ये मेट्रोचं जाळं पसरलं होतं. आज ती परिस्थिती नाही. दोन डझनहून अधिक शहरात मेट्रो सुरू झाली आहे किंवा सुरू होणार आहे असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. आज महाराष्ट्रात मेट्रो नेटवर्कचा वेगाने विस्तार होतो आहे. आज मी सगळ्या शहरांमधल्या लोकांना विनंती करतो, त्यातही ज्यांना हाय क्लास समजलं जातं त्यांना मी विनंती करेन की मेट्रोने प्रवास करायची सवय ठेवा. तुम्ही जितका जास्त मेट्रोचा वापर कराल तेवढी तुम्ही शहरांची मदत करत आहात हे लक्षात ठेवा असंही मोदींनी आपल्या भाषणात म्हटलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT