जास्त व्याजाचं आमिष दाखवून गुंतवणुकदारांना कोट्यवधींचा गंडा, दोन्ही आरोपी अटकेत
अकोला येथील मुंडगावकर ज्लेवर्समध्ये शेकडो नागरिकांना आकर्षक व्याजाचं आमिष देऊन कोट्यवधींची गुंतवणूक करायला लावत पसार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमोल विजय पिंजरकर आणि उदय विजय पिंजरकर अशी या दोन आरोपी भावांची नावं आहेत. मंगळवारी रात्री उशीरा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर […]
ADVERTISEMENT
अकोला येथील मुंडगावकर ज्लेवर्समध्ये शेकडो नागरिकांना आकर्षक व्याजाचं आमिष देऊन कोट्यवधींची गुंतवणूक करायला लावत पसार झालेल्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अमोल विजय पिंजरकर आणि उदय विजय पिंजरकर अशी या दोन आरोपी भावांची नावं आहेत.
ADVERTISEMENT
मंगळवारी रात्री उशीरा आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी अमरावती येथून दोन्ही आरोपींना अटक केली आहे. बुधवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केलं असता दोन्ही आरोपींना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून युवकाची विषारी औषध खाऊन आत्महत्या
हे वाचलं का?
या प्रकरणात आतापर्यंत ३७८ तक्रारी करण्यात आल्या आहेत. रोज गुंतवणूकदार फसवणूक झाल्याच्या तक्रारी घेऊन आर्थिक गुन्हे शाखेत येत आहेत. आतापर्यंत या दोन्ही भावांनी गुंतवणुकदारांची २५.८५ कोटी रुपयांची फसवणूक केली आहे.न्यू मुंडगावकर ज्वेलर्स, श्री मुडगावकर ज्वेलर्स या दुकानांमध्ये रोख रक्कम व सोन्याची गुंतवणूक केल्यास त्यावर आकर्षक व्याजदर देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना या दोन्ही भावांनी दाखवलं होतं. आरोपी अमोल पिंजरकरने गुंतवणूकीचे पैसे हातात आल्यानंतर दुकानाला टाळं ठोकून भावासोबत पसार झाला.
या घटनेचं स्वरुप पाहता आणि काही तक्रारदार समोर येण्याची शक्यता वर्तवली जात असून पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT