अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर ED ने आणली जप्ती

दिव्येश सिंह

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ईडीने अर्थात Enforcement Directorate ने अजित पवार आणि त्यांच्या पत्नीशी संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्यावर जप्ती आणली आहे. अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्र कुमार घाडगे यांच्या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर कारवाई झाल्याने आता चर्चा सुरू झाली आहे ती अजित पवारांच्या अडचणी वाढणार का? या प्रश्नाची. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई उच्च न्यायालयात चार याचिकाकर्त्यांनी जनहित याचिका दाखल केल्यानंतर महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळा उघडकीस आला. विविध साखर कारखानदारांनी कोट्यवधी रूपयांचं कर्ज चुकवल्याचा आरोप आपल्या याचिकांमध्ये केला होता.

ADVERTISEMENT

या साखर कारखान्यावर 2010 मध्ये 78 कोटी 90 लाखांच्या थकीत कर्जापोटी महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने जप्ती आणली होती. त्यानंतर हा कारखाना अजित पवार यांचे मावस भावाच्या कंपनीने लिलावात घेतला. माजी आमदार आणि महसूल मंत्री शालिनीताई पाटील या जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या संस्थापिका आणि चेअरमनही होत्या. 16 जुलै 2010 हा कारखाना बँकेकडून लिलावात काढण्यात आला. साखर कारखान्याचा लिलाव झाल्यानंतर अजित पवार यांचे मावस भाऊ राजेंद्रकुमार घाडगे यांच्या कंपनीने हा कारखाना विकत घेतला. ज्यानंतर हा लिलाव हेतूपुरस्सर झाल्याचा आरोप करण्यात आला होता. ज्या कंपनीची वार्षिक उलाढाल एक कोटीहून कमी होती त्या कंपनीने 60 कोटींपेक्षा जास्त किंमत असलेला कारखाना कसा विकत घेतला? हा प्रश्न निर्माण झाला. याबाबत सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली. ज्यानंतर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आता याच गुन्ह्याच्या अनुषंगाने ईडीने गुन्हा दाखल करून जप्तीची कारवाई केली आहे.

ईडीने जरंडेश्वर साखर कारखान्याची जमीन, इमारत, त्याचा आराखडा आणि त्यामध्ये असलेले प्लांट आणि मशीन्स अशा सगळ्यावरच जप्ती आणली आहे. हा कारखाना सातारा जिल्ह्यातील कोरेगाव या ठिकाणी असलेल्या चिमणगावमध्ये आहे. या कारखान्याची खरेदी 2010 मध्ये अवघ्या 65 कोटी 75 लाखांमध्ये करण्यात आली होती अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली आहे.

हे वाचलं का?

सध्या ही मालमत्ता M/S गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडकडे यांच्या नावाने असून त्यांनी जरंडेश्वर साखर कारखान्याला दिली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्यातला मोठा हिस्सा M/S स्पार्कलिंग सॉईल लिमिटेड यांच्याकडे आहे. तपासात हे समोर आलं आहे की M/S स्पार्कलिंग सॉईल लिमिटेड महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित कंपनी आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने 2010 जरंडेश्वर साखर कारखान्याचा लिलाव केला. ज्या लिलावात बाजारमूल्यापेक्षा कमी किंमतीत या साखर कारखान्याचा लिलाव करण्यात आला. त्यावेळी अजित पवार महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे संचालकांपैकी एक होते. हा कारखाना गुरू कमोडिटीने विकत घेतला आणि लगेचच जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याला चालवायला दिला. या साखर कारखान्याच्या खरेदीसाठी मोठा भाग हा मेसर्स स्पार्कलिंग प्रा. लिमिटेडकडून घेण्यात आला. जी कंपनी अजित पवार आणि त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांच्याशी संबंधित आहे.

ADVERTISEMENT

तपासात हे देखील समोर आलं आहे की गुरू कमोडिटी सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ही एक डमी कंपनी होती. जिचा जरडंश्वेर सहकारी साखर कारखाना चालवण्यासाठी करण्यात आला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हे देखील म्हटलं आहे की जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याने 2010 पासून गैरवापर पुणे जिल्हा सहाकरी बँकेकडून सुमारे 700 कोटींचं कर्ज घेण्यासाठी करण्यात आला. त्यामुळे जरंडेश्वर साखर कारखान्याची जी संपत्ती जसे की जमीन, इमारत, मशीनरी, आऱाखडा, प्रकल्प इत्यादीचा वापर गुन्ह्यासाठी केला आहे. त्यामुळेच PMLA अंतर्गत ईडीने यावर जप्ती आणली आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT