जॅकलिन फर्नांडिसची नाकेबंदी! ईडीने फेटाळून लावली ‘ही’ मागणी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

कोट्यवधी रूपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसचा संबंध आहे. सुकेश चंद्रशेखरशी केलेली मैत्री त्याच्याकडून स्वीकारलेली गिफ्ट तिला चांगलीच महागात पडली आहेत. सुकेश चंद्रशेखर हा तिचा कथित बॉयफ्रेंड आहे मात्र तो तिच्यासाठी अनंत अडचणींचं आगार झाला आहे. जॅकलिनच्या कामावरही त्याचा परिणाम होतो आहे. तिच्या कामानिमित्त ती विदेशात जात होती मात्र तेव्हा तिला मुंबई एअरपोर्टवरच अडवण्यात आलं. आता ईडीने जॅकलिनची आणखी एक मागणी फेटाळून लावली आहे.

ADVERTISEMENT

अभिनेत्री जॅकलिन विरोधात अंमलबजावणी संचलनालयाने तिच्या विरोधात एक लुकआऊट नोटीस जारी केली होती. त्यामुळे जॅकलिनला देश सोडता येणार नाही. नेमकी हीच नोटीस हटवण्यात यावी अशी विनंती जॅकलिनने ईडीकडे केली होती. मात्र ईडीने तिची ही मागणी फेटाळून लावली आहे. त्यामुळे जॅकलिनला आता भारत सोडून विदेशात कामानिमित्तही जाता येणार नाही.

सुकेश चंद्रशेखर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस आयुष्यात कधी व कसा आला?

हे वाचलं का?

माझ्या विरोधात असलेली लुक आऊट नोटीस हटवण्यात यावी अशी विनंती जॅकलिनने ईडीला केली होती. मला भारताबाहेर जाणं आवश्यक आहे असंही तिने कळकळीने सांगितलं होतं. मात्र ईडीने तिची विनंती फेटाळून लावली आहे. त्यामुळे एकप्रकारे ईडीने तिची नाकेबंदीच केली आहे असं म्हणता येईल. जॅकलिनला आता ईडी संमती देत नाही तोपर्यंत भारत सोडता येणार नाही. आजतकला सूत्रांनी यासंदर्भातली माहिती दिली आहे.

ADVERTISEMENT

माझ्या प्रोफेशनल कमिटमेंट्स आहेत त्यामुळे मला विदेशात जायचं आहे असं जॅकलिनने ईडीला सांगितलं होतं. या सगळ्या प्रकरणाच्या आधी मी या कमिटमेंट्स केल्या होत्या त्यासाठी विदेशात जाणं आवश्यक आहे. त्यामुळेच माझ्या विरोधातली लुक आऊट नोटीस हटवण्यात यावी. मात्र ईडीने हे करण्यास नकार दिला आहे. ईडीने जॅकलिनला अद्याप कोणतीही क्लिन चिट दिलेली नाही. ईडीच्या रडारवर जॅकलिन अजूनही आहे. आत्तापर्यंत चारवेळा जॅकलिनची चौकशी ईडीतर्फे करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

सुकेश चंद्रशेखर याने एका बिझनेसमन महिलेकडून 200 कोटी रूपये वसूल केले होते. तिला खोटं आश्वासन देऊन त्याने हे पैसे लुबाडले. याच सुकेशचे जॅकलिनसोबत संबंध असल्याची माहिती समोर आली. सुकेशने जॅकलिनला अनेक महागडी गिफ्ट दिल्याचंही समोर आलं आहे. 500 कोटी रूपये खर्च करून तो जॅकलिनसाठी सिनेमाही आणणार होता. याच प्रकरणात नोरा फतेहीचंही नाव समोर आलं आहे. नोराने या प्रकरणी प्रॉसिक्युशनचा साक्षीदार होण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT