चौकशीसाठी हजर रहा ! ED चं माजी गृहमंत्री अनिल देशमुखांना समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मनी लाँड्रींग प्रकरणात महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावलं आहे. ईडीचे अधिकारी आज देशमुख यांची चौकशी करणार आहेत. काही दिवसांपूर्वी ईडीने अनिल देशमुखांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरांवर छापेमारी केली होती. NIA च्या अटकेत असलेला पोलीस अधिकारी सचिन वाझेकडून १०० कोटी मागितल्याचा आरोप अनिल देशमुखांवर आहे.

ADVERTISEMENT

अनिल देशमुखांनी सचिन वाझेंकडून मिळालेला पैसा बोगस कंपन्यांद्वारे आपल्या कुटुंबियांच्या नावावर वळवला. ईडीने या प्रकरणात अनिल देशमुख यांचे सहकारी कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे यांना अटक केली आहे. अनिल देशमुख यांनाही काही दिवसांपूर्वी समन्स बजावण्यात आलं होतं. परंतू देशमुखांच्या वकिलांनी या समन्सला उत्तर देत आता हजर राहता येणं शक्य होणार नसल्याचं सांगितलं. यानंतर ईडीने आज पुन्हा एकदा अनिल देशमुखांना समन्स बजावलं आहे.

कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे हे अनिल देशमुखांसाठी पैसे बोगस कंपन्यामार्फत वळवायचे असा ईडीचा दावा आहे. दरम्यान या प्रकरणात अनिल देशमुख आणि नागपुरातील अन्य मंत्री व सनदी अधिकाऱ्यांवर तक्रार दाखल करणाऱ्या वकील तरुण परमार यांचीही ईडीने चौकशी केली. विभागातील बदल्या, वाळू उपस्याचे ठेके, ई-टेंडरिंग प्रकरणात भ्रष्टाचार होत असून अनिल देशमुखांचा यात सहभाग असल्याचे पुरावे परमार यांनी ईडीला दिले आहेत. त्यामुळे अनिल देशमुख आज ईडीसमोर हजर राहतात का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT