महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात ED जारी करणार नवं समन्स

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ED ने म्हणजेच अंमलबजावणी संचलनालयाने नवं समन्स जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. ED कडून पुढच्या आठवड्यात अनिल देशमुख यांची चौकशी करण्यात येईल असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. कुंदन शिंदे आणि संजीव पालांडे या दोघांना अटक करण्यात आली आहे. ED ने रात्री उशिरा ही कारवाई केली आहे. संजीव पालांडे यांना हा सगळा व्यवहार माहित आहे तसंच कुंदन शिंदे यांनी काही रोख रक्कमही स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे असंही ईडीने म्हटलं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांना पदावरून हटवल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. या पत्रात त्यांनी अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा गैरवापर केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर API सचिन वाझेंना अनिल देशमुख यांनी बार आणि रेस्तराँमधून दर महिन्याला 100 कोटींची वसुली करण्याचं टार्गेट दिलं होतं असंही म्हटलं होतं.

ADVERTISEMENT

या पत्रामुळे खळबळ उडाली होती. या पत्रात अनिल देशमुख हे पोलिसांच्या बदल्यांमध्ये आणि पदोन्नतीमध्ये ढवळाढवळ करत आहेत असाही आरोप करण्यात आला होता. यानंतर भाजपने अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सुरूवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणी दोन वेळेस पत्रकार परिषद घेतली आणि परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य नसल्याने अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं म्हटलं होतं. मात्र परबमीर सिंग कोर्टात गेले. हे प्रकरण जेव्हा बॉम्बे हायकोर्टात गेलं तेव्हा कोर्टाने सीबीआय चौकशीचे आदेश दिले. ज्यानंतर अनिल देशमुख यांना त्यांचं पद सोडावं लागलं. सीबीआयने प्राथमिक चौकशी केली आणि FIR दाखल केली. त्यानंतर ED ने आक्रमक होत कारवाई सुरू केली आहे.

शुक्रवारी ED चे अधिकारी अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबई येथील घरी पोहचले. अनिल देशमुख आणि त्यांचा एक मुलगा हे दोघेही मुंबईतल्या निवासस्थानी होते. ही कारवाई एका डेप्युटी कमिश्नर लेव्हलच्या अधिकाऱ्याचं स्टेटमेंट घेतल्यानंतर ईडीने केली. आता मुंबई पोलिसांच्या Enforcement wing चे इनचार्ज डीसीपी राजू भुजबळ हे आहेत. त्यांनी याआधी सामाजिक सेवा विभागही सांभाळला आहे त्यावेळी त्यांनी पब्स, हुक्का पार्लर्स, डान्स बार, बार आणि रेस्तराँ यांच्यावरही धाडी मारल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणखी काही पोलिसांचीही या प्रकरणी चौकशी होणार आहे.

हे वाचलं का?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ईडीच्या अधिकाऱ्यांना सुमारे चार कोटी रूपये रक्कम जी साधारण 12 बार आणि रेस्तराँ मालक यांच्याकडून खंडणीच्या स्वरूपात घेण्यात आली होती त्याचा सुगावा लागला आहे. सचिन वाझेंनी ही रक्कम गोळा केली होती. हे पैसे महाराष्ट्राच्या बाहेर असलेल्या काही शेल कंपन्यांमार्फत अनिल देशमुख यांच्याकडे वळवण्यात आली. ही कंपनी अनिल देशमुख यांच्या जवळच्या नातेवाईकाची आहे असंही सूत्रांचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT