राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर पहिल्याच नगरपंचायत निवडणुकीत नाथाभाऊंचा पराभव
मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मनाला जातो, मात्र नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नवखे आमदार चंद्रकांत पाटील यांची एकनाथ खडसेंना धोबीपछाड दिला आहे. बोडबद नगरपंचायत मध्ये शिवसेनेने 17 जागांपैकी 09 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. बोदवड मधील पराभव एकनाथ खडसेंना जबर धक्का मनाला जातो आहे. राष्ट्रवादी काँग्रेस […]
ADVERTISEMENT
मनिष जोग, जळगाव, प्रतिनिधी
ADVERTISEMENT
राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव जिल्ह्यातील बोदवड एकनाथ खडसेंचा बालेकिल्ला मनाला जातो, मात्र नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे नवखे आमदार चंद्रकांत पाटील यांची एकनाथ खडसेंना धोबीपछाड दिला आहे. बोडबद नगरपंचायत मध्ये शिवसेनेने 17 जागांपैकी 09 जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे. बोदवड मधील पराभव एकनाथ खडसेंना जबर धक्का मनाला जातो आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्या नंतर एकनाथ खडसेंसाठी ही पहिलीच निवडणूक होती. या निवडणुकीत खडसेंचा पराभव झाल्याने जिल्ह्यात नवीन राजकीय समीकरण तयार होतील असा अंदाज राजकीय विश्लेषकांचा आहे.
हे वाचलं का?
भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसेंसाठी बोदवडची निवडणूक महत्वाची मनाली जात होती. राष्ट्रवादी पक्षात आपली ताकद दाखवण्याची संधी खडसेंकडे होती मात्र शिवसेनेचे स्थानिक आमदार चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना जोरदार आवाहन देत खडसेंचा कधीकाळी असलेला बालेकिल्ल्यात शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली आहे.
ADVERTISEMENT
निवडणुकीदरम्यानच खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंच्या कारवर हल्ला झाला होता हा हल्ला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप खडसें परिवाराने केला होता.शिवसेना पदाधिकाऱ्यांवर पोलिसांत गुन्हाही दाखल करण्यात आला होता. त्याच राजकारणही चांगलंच तापलं होतं.
ADVERTISEMENT
बोदवडच्या निवडणूक प्रचारावेळी राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील भाजपचे गिरीश महाजन त्यांच्यात आरोप-प्रत्योरापांच्या फैरी झडल्या होत्या. मात्र निकालात शिवसेनेच्या बाजूने मतदारांनी कौल दिला आहे. बोदवड मध्ये आता शिवसेनेची सत्ता आहे राज्यात सत्ता महाविकास आघाडीची सत्ता आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे आहेत. स्थानिक वाद बाजूला ठेऊन अनेक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या बोदवडवासीयांना राज्यात सत्ताधारी घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादीचे एकनाथ खडसे ,आमदार चंद्रकांत पाटील यांनी एकत्र येऊन विकासाचा राजकारण करावं एवढीच आता माफक अपेक्षा नागरिकांना आहे.
बोदवड नगरपंचायतच्या 17 जागांपैकी शिवसेनेला सर्वाधिक नऊ जागांवर विजय मिळवत स्पष्ट बहुमत मिळवलं आहे राष्ट्रवादी काँग्रेसला सात जागा तर भाजपला फक्त एका जागेवर समाधान मानावे लागलं आहे.
बोदवड मधील पराभव एकनाथ खडसेंना किंबहुना राष्ट्रवादी काँग्रेसला आत्मचिंतन करावा लागणारा आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT