Eknath Shinde: शिवसेनेच्या लढाईत ठाकरे चीतपट, CM शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (17 फेब्रुवारी) शिवसेना पक्ष आणि त्यांच्या धनुष्यबाण चिन्हाबाबत एक अत्यंत मोठा असा निर्णय दिला. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह हे दोन्ही एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केलं. निवडणूक आयोगाचा हा निर्णय राज्यातील राजकारणावर दूरगामी असा परिणाम करणार आहे. कारण आजवर महाराष्ट्रात शिवसेना म्हणजे ठाकरे असं समीकरण होतं. पण आता निवडणूक आयोगाने दोन्ही गोष्टी शिंदेंना देण्याचा निर्णय घेतला आहे.

ADVERTISEMENT

जेव्हा निवडणूक आयोगाने हा संपूर्ण निकाल जाहीर केला त्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

पाहा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले:

‘निवडणूक आयोगाला धन्यवाद देतो. कारण हा लोकशाहीचा विजय आहे. हा भारतीय घटनेचा विजय आहे आणि बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असतं. हा सत्याचा विजय झाला आहे.’

हे वाचलं का?

‘जो संघर्ष केला त्याचा विजय झाला आहे. पुन्हा एकदा सांगतोय की, हा विजय बाळासाहेबांच्या विचारांचा आहे. त्यांचे विचार, त्यांची भूमिका घेऊन आम्ही सरकार स्थापन केलं. आज शेवटी सत्याचा विजयट झाला आहे. मी धन्यवाद देतो निवडणूक आयोगाला.’

‘माझी भूमिका तीच आहे.. कालही तीच होती आजही तीच आहे. बाळासाहेबांचे विचार त्यांची भूमिका आम्ही पुढे नेत आहोत. राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम सरकारच्या माध्यमातून आणि बाळासाहेबांच्या भूमिकेतून पुढे घेऊन जात आहोत.’

ADVERTISEMENT

‘अखेर सत्याचा विजय झाला. बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचा विजय झाला आहे. बाळासाहेबांच्या विचारांशी आणि आम्ही घेतलेला जो निर्णय आहे त्या विचारांबरोबर एकरूप झालेले आमदार, खासदार लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि असंख्य हजारो शिवसैनिकांचा हा विजय आहे. हा लोकशाहीचा विजय आहे. या देशात बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे कारभार चालतो. आम्ही निर्णय घेतला की, या राज्यात जी घटना आहे, नियम आहे कायदा आहे.. त्याच घटनेच्या आधारे आम्ही सरकार स्थापन केलं. त्यामुळे आजचा जो निर्णय आहे निवडणूक आयोगाने दिलेला. मेरीटवर दिलेला निर्णय आहे. मला विरोधकांच्या आरोपावर प्रतिक्रिया देणं आवश्यक वाटत नाही.’ अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदेंनी मुंबई Tak शी बोलताना दिली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप आणणारा फैसला अखेर सुनावला. निवडणूक आयोगातील कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष असताना केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि निवडणूक चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिलं. निवडणूक आयोगाने शुक्रवारी सायंकाळी हा निर्णय दिला. निवडणूक आयोगाचा निर्णय हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का असून, आता ठाकरे काय भूमिका घेणार? सुप्रीम कोर्टाचं दार ठोठावणार का? हे पाहावं लागेल.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT