Thackeray vs shinde : तेच रडगाणं, तिच सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न : शिंदे गटाकडून ठाकरेंच्या भाषणाची खिल्ली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई : दसरा मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलण्याचा सल्ला दिला होता. पण आजही तेच रडगाणं, तिच सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, अशा शब्दात शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आजच्या भाषणाची खिल्ली उडवली.

ADVERTISEMENT

शिवसेना पक्षाचे नाव आणि पक्ष चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच माध्यमांसमोर आले होते. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतचे ४० आमदार, १२ खासदार आणि भाजपवर जोरदार निशाणा साधला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना म्हस्के बोलत होते.

Uddhav Thackeray : 40 डोक्यांच्या रावणानं प्रभु रामाचं धनुष्य-बाणं गोठवलं : ठाकरेंचा संताप

हे वाचलं का?

कट्यार काळजात कोणी घुसवली? जेव्हा तुम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री झालात. या अडीच वर्षांच्या काळात हिंदुत्ववाच काय झालं याबाबत काही बोलले नाहीत. खूर्चीसाठी तडजोड केली म्हणून ही वेळ आली. दसरा मेळाव्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचा स्क्रिप्ट रायटर बदलण्याचा सल्ला दिला होता. पण आजही तेच रडगाणं, तिच सहानभूती मिळवण्याचा प्रयत्न सुरु आहे, असे म्हस्के यांनी सांगितले.

Uddhav Thackeray : काँग्रेसने केलं नाही ते तुम्ही करताय; मग गुन्हेगार कोण? CM शिंदेंना सवाल

ADVERTISEMENT

आजच्या भाषणादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचं नाव न वापरता समोर या. स्वतःचा पक्ष काढा, भाजपमध्ये जा, असे आव्हान दिले होते. शिवाय आजही तुम्हाला शिवसेना पाहिजे, बाळासाहेब पाहिजेत, पण बाळासाहेबांचा मुलगा नको, अशी टीकाही त्यांनी केली होती. या सगळ्यावर प्रत्यूत्तर देताना म्हस्के म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा कधीही नको असे कधीही म्हटले नाही, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांची संगत सोडा, असे आम्ही म्हटले होते. तसेच बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेऊ नये असे कोणी सांगू नये, ते आमचे दैवत आहेत, असेही म्हस्के यांनी स्पष्ट केले.

ADVERTISEMENT

Thackeray vs shinde : शिंदे, सगळं सहन केलं पण आता अति होतंय : उद्धव ठाकरे यांना संताप अनावर

उद्धव ठाकरे यांनी बोलताना आपण आजच्या आज चिन्ह आणि नाव दिली असे सांगितले होते. मात्र शिंदे गटाने काहीही दिले नसल्याचे ते म्हणाले. त्यावर बोलताना म्हस्के म्हणाले, चिन्ह गोठवल्याचे आम्हाला ही दुःख आहे. मात्र बहुमत आमच्याकडे आहे, त्यामुळे शिवसेना आणि चिन्ह आम्हाला मिळेल या बाबत शंका नाही. यांनी कागदपत्रे दिलेली नाहीत, हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे आज सकाळी लगेच चिन्ह आणि नाव यांचे पर्याय दिले, असेही ते म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT