३ ऑगस्टलाही विनायक मेटेंचा अपघात करण्याचा प्रयत्न झाला? काय घडलं होतं? चालकाने सांगितलं..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

माजी आमदार विनायक मेटे यांचं १४ ऑगस्टला अपघाती निधन झालं. त्यानंतर त्यांचा अपघात झाला की त्यांच्यासोबत काही घातपात घडला हा प्रश्न उपस्थित होतो आहे. कारण विनायक मेटे ज्या कारमध्ये बसले होते त्या कारचा चालक आणि त्याच्या बाजूला बसलेला अंगरक्षक दोघेही वाचले. मात्र विनायक मेटे जिथे बसले होते तिथली एअरबॅग उघडली नाही त्यामुळे या सगळ्या घटनेबाबत विविध चर्चा सुरू आहेत. अशात ३ ऑगस्टला विनायक मेटेंचा अपघात करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

ADVERTISEMENT

Exclusive : विनायक मेटे ज्या SUV ने प्रवास करत होते त्यावर ४७ चलन, ४७ हजारांचा दंड बाकी

विनायक मेटे यांचा ३ ऑगस्टलाही अपघात करण्याचा प्रयत्न?

विनायक मेटे यांची कार त्या दिवशी चालक समाधान वाघमारे होता त्याने ही माहिती दिली आहे. समाधान वाघमारे या चालकाने दिलेल्या माहितीनुसार ३ ऑगस्टला विनायक मेटे हे एरटिगा गाडीने प्रवास करत होते. त्यांच्यासोबत अण्णा माईकर हे कार्यकर्तेही होते. त्यावेळी एका कारने त्यांच्या कारला दोनवेळा कट मारला. जाणीवपूर्वक आपली कार विनायक मेटे यांच्या कारला धडकवण्याचा प्रयत्न यादिवशी झाला होता. अण्णा माईकर हे विनायक मेटेंसोबत प्रवास करत होते. याविषयीची माहिती समाधान वाघमारे यांनी दिली आहे.

हे वाचलं का?

Mumbai-Pune Expressway: आनंद अभ्यंकर ते विनायक मेटे ‘या’ दिग्गजांनी एक्स्प्रेस वेवर गमावला जीव

या प्रकरणाची माहिती सीसीटीव्ही तपासल्यास मिळेल असंही अण्णा माईकर यांनी म्हटलं आहे. तसंच हा अपघाताचा कट होता की घातपाताचा याची चौकशी करण्याचीही मागणी आता होते आहे. या दोघांचं संभाषणही व्हायरल झालं आहे. यानंतर विनायक मेटे यांच्या पत्नीचीही प्रतिक्रिया समोर आली आहे.

ADVERTISEMENT

ज्योती मेटे फोन क्लिपबाबत काय म्हणाल्या आहेत?

३ ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचे देखील अण्णासाहेब यांनी मला सांगितलं. त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे असं ज्योती मेटे यांनी म्हटलं आहे. अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

विनायक मेटेंचा अपघातासंदर्भात कॉल रेकॉर्डिंग समोर आल्यानंतर या संदर्भात विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली आहे. त्या म्हणाल्या की व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकली आहे. अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझंही बोलणं झालं आहे. त्यांचं म्हणणं होतं की समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी अशा पद्धतीने गाडी ओव्हरटेक करत होती. ही बाब निश्चित आक्षेपार्ह होती. त्यामुळे एकूण प्रकारची झाली पाहिजे अशी मागणी ज्योती मेटे यांनी केली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT