रमजान ईदच्या दिवशीही मुस्लिम युवकांनी केले कोरोना रूग्णांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार, घालून दिला नवा आदर्श

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रमजान ईद असल्याने अनेक युवक कोव्हिडचे नियम पाळून त्यांचा सण साजरा करत आहेत. अशात नांदेडचे युवक मात्र आजही अंत्यसंस्कारांचं काम करत आहेत. एकीकडे मिठाई आणि शिरखुर्मा खाऊन, वाटून ईद साजरी केली जाते आहे. तर दुसरीकडे नांदेडच्या हॅपी क्लबचे मुस्लिम युवक कब्रस्तानात कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतांवर अंत्यसंस्कार करत आहेत. ईदच्या दिवशीही त्यांनी हे कार्य सोडलेलं नाही त्यामुळे त्यांनी एक वेगळाच आदर्श आपल्या कृतीतून घालून दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे आजपर्यंत या सगळ्या तरूणांनी सर्व धर्मीयांच्या मृतांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

ADVERTISEMENT

नांदेडच्या हॅपी क्लबच्या युवा सदस्यांनी गेल्या वर्षी ज्या रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यांची जात, धर्म न पाहता त्यांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले, ती परंपरा त्यांनी या वर्षीही सुरू ठेवली आहे. आत्तापर्यंत या युवकांनी सुमारे 900 हून जास्त मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत. आज रमजान ईद आहे. मुस्लिम बांधवांचा हा सगळ्यात मोठा सण मानला जातो तरीही या दिवशीही त्यांनी या गोष्टीमध्ये खंड पाडलेला नाही. रोझे ठेवलेले असतानाही या युवकांनी मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले.

कोरोना काळात लोकांना असेही अनुभव येत आहेत की ज्यावेळी लोकांना त्यांचे सख्खे लोक विचारत नाहीत. माणुसकीचा अभाव अनेक प्रकरणांमध्ये समोर येतो आहे. अशा वेळी हे युवक त्यांचं काम विसरलेले नाहीत. हॅपी क्लबचे हे युवक गेल्या वर्षभरापासून सर्व धर्मीयांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT