Owaisi यांच्या कारवर कसा झाला गोळीबार?, गोळीबाराचा Video मुंबई Tak च्या हाती

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मेरठ: ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)चे प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी काल (गुरुवार) दावा केला होता की, मेरठहून परतत असताना त्यांच्या गाडीवर गोळीबार करण्यात आला. या संदर्भात आता ‘मुंबई Tak’च्या हाती ओवेसींच्या गाडीवर गोळीबार झाल्याचे खास सीसीटीव्ही फुटेज लागलं आहे. ज्यामध्ये लाल टी-शर्ट घातलेला एक तरुण टोलवरून जाणाऱ्या ओवेसींच्या गाडीकडे जाताना दिसत आहे.

ADVERTISEMENT

हल्लेखोर ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करताना आणि पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे व्हीडिओमध्ये दिसत आहे. मात्र त्याआधी एक हल्लेखोर कारच्या समोर येतो पण कारची धडक बसल्याने तो रस्त्यावरच पडल्याचं दिसतं आहे.

दरम्यान, समोरून पांढरा शर्ट घातलेला आणखी एक तरुण हातात बंदूक घेऊन येतो. हाच तरुण ओवेसींच्या गाडीवर गोळीबार करताना दिसत आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुसऱ्या हल्लेखोराचा चेहराही दिसत आहे.

हे वाचलं का?

हल्ल्यानंतर ओवेसी काय म्हणाले?

असदुद्दीन ओवेसी यांनी आरोप केला की, ‘मी मेरठ जिल्ह्यातील किठौरमध्ये निवडणुकीच्या कार्यक्रमानंतर दिल्लीला जात होतो. यादरम्यान 2 जणांनी माझ्या कारवर छिजारसी टोल प्लाझाजवळ 3-4 राऊंड गोळीबार केला. ते एकूण 3-4 जणं होते. माझ्या गाडीचे टायर पंक्चर झाले. पण नंतर मी तिथून दुसऱ्या गाडीने पुढे निघालो.

ADVERTISEMENT

‘आज तक’शी खास बातचीत करताना ओवेसी म्हणाले, ‘सर्वांना माहीत होते की, आम्ही मेरठहून दिल्लीला रवाना झालो आहोत. टोल प्लाझाजवळ गाडीचा वेग कमी होतो हे सर्वांना माहीत आहे आणि यादरम्यान हल्लेखोराने मला लक्ष्य करत गोळीबार केला. हल्लेखोरांनी गोळीबार केल्यावर आमच्या ड्रायव्हरने प्रसंगावधान राखलं आणि तात्काळ तिथून गाडी वेगाने पुढे पळवली. माझ्यावर गोळ्या झाडणाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे. कारण त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.’

ADVERTISEMENT

या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हायला हवी : ओवेसी

ओवेसी म्हणाले, ‘आम्ही मोदी सरकार आणि राज्य सरकार या दोघांनाही सांगत आहोत की, या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची जबाबदारी त्यांची आहे. एका खासदारावर 4 राऊंड गोळीबार कसा होऊ शकतो?’

‘माझं पोलीस अधिकाऱ्यांशी बोलणं झालं असून त्यांनी एका व्यक्तीला पकडण्यात आल्याचं सांगितलं आहे. तसेच शस्त्रही जप्त करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. आम्ही निवडणूक आयोगाला या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची विनंती करतो.’

त्याचवेळी हापूडचे एसपी दीपक भुकर यांनी सांगितले की, ‘असदुद्दीन ओवेसी यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठले आणि एका संशयिताला ताब्यात घेतले. तसेच शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्याचा एक साथीदार पळून गेला असून त्याचा शोध सुरू आहे.’

दोन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली, तर दुसऱ्याने गाझियाबाद पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले. सीसीटीव्हीच्या आधारे एका व्यक्तीची ओळख पटली आहे. त्यानंतर त्या व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेण्यात आलं असून सध्या त्याची चौकशी सुरू आहे.

मोठी बातमी: असदुद्दीन ओवेसींच्या गाडीवर गोळीबार, दोन गोळ्या कारमध्ये घुसल्या; ओवेसी सुरक्षित

तपासासाठी 5 टीम तयार – ADG कायदा आणि सुव्यवस्था

उत्तर प्रदेशातील हापूड जिल्ह्यात एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या वाहनावर झालेल्या गोळीबाराची माहिती देताना एडीजी (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर इतरांना पकडण्यासाठी 5 पथके तयार करण्यात आली आहेत. ते म्हणाले की, आयजी मेरठ स्वत: या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT