मांत्रिकाने काळ्या बाटलीतून दिले विष; सांगलीतल्या 9 जणांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वाती चिखलीकर

ADVERTISEMENT

सांगली: सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील म्हैसाळ गावचे पशुवैद्यक तज्ज्ञ डॉ. माणिक वनमोरे व पोपट वनमोरे या दोघा सख्ख्या भावांच्या कुटुंबीयातील तब्बल नऊ जणांनी विष प्राशन करून सामूहिक आत्महत्या केली होती. या आत्महत्येनंतर जिल्हा हादरुन गेला होता. खासगी सावकारांच्या त्रासाला कंटाळून वनमोरे कुटुंबियांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले होते, मात्र नंतर सखोल पोलीस तपासात या सामूहिक आत्महत्या नसून हे हत्याकांड असल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. मात्र आता पोलीस तपासात हे हत्याकांड गुप्तधनाच्या कर्मकांडातून झाले असल्याचे पुरावे समोर आले आहेत.

गुप्तधनाच्या लालसेपोटी संपलं आख्ख वनमोरे कुटुंब

गुप्तधनाच्या लालसेपोटी वनमोरे कुटूंबियांनी वेळोवेळी दिलेले पैसे परत देण्यासाठी तगादा लावल्याने त्यांना अब्बास बागवान या मांत्रिकाने संपवले असल्याने, महाराष्ट्र अंधश्रद्धा अधिनियम कलम ३ नुसार अधिकचे गुन्हे दाखल केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी पत्रकार परिषदेत दिली. मांत्रिक अब्बास बागवान आणि त्याचा ड्रायव्हर धीरज सुरवसे या दोघांनी या हत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या दोघांना अटक करण्यात आली असून 8 जुलै पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

आरोपीच्या घरी आढळल्या संशयीत वस्तू

अब्बास बागवान याच्या सोलापूर येथील घरी झडती घेतली असता तेथे पोपट वनमोरे यांच्या नावाचे कोरे चेक्स, सुसाईड नोट्सच्या 2 झेरॉक्स कॉपीज, काही पांढऱ्या कवड्या, धागा बांधलेला एका डोळ्याचा नारळ, आणखी काही कर्मकांडाचे साहित्य सापडले आहे. वनमोरे बंधूनी काही सावकारांकडून तसेच काही ओळखीच्या लोकांकडून पैसे घेऊन वेळोवेळी या मांत्रिकाला दिले होते. त्या सर्वांची नावे चिठ्ठीमध्ये लिहिली असल्याने पोलिसांनी अशा 25 जणांवर गुन्हे दाखल केले होते. त्यापैकी 19 जणांना अटक करण्यात आली आहे. आता पून्हा त्याचा तपास करून त्यानी जे खरोखरच सावकारी करतात त्यांच्यावरच कारवाई केली जाईल असे पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी स्पष्ट केले आहे.

हत्याकांडाच्या रात्रीचा घटनाक्रम

हत्याकांडाच्या रात्री म्हणजे 19 जूनला संशयित अब्बास बागवान हा धीरज सुरवसे याच्या सह म्हैसाळ येथे वनमोरे यांच्या घरी आला होता. वनमोरे याच्या घरी येऊन सोबत जेवण केलं, त्यानंतर पूजा विधी केले. त्यानंतर अकराशे गहू प्रत्येकाला 7 वेळा मोजण्यास सांगितले, त्या दरम्यान ९ बाटल्यांमध्ये काळ्या रंगाचे विष पाण्यामध्ये मिसळून, प्रत्येकाला गच्चीवर एकेकटे बोलवून बाटलीतील द्रव पिण्यास सांगितले, शेजारच्या खोलीत जाऊन शांत झोपण्यास सांगितले. त्यानंतर काही वेळातच पोपट वनमोरे आणि नंतर माणिक वनमोरे यांचे कुटुंबातील सर्व सदस्यांना हे औषध पिण्यास देऊन संपवण्यात आले आहे.

ADVERTISEMENT

घेतलेले पैसै द्यावे लागू नये म्हणून…

या हत्या होण्यापूर्वीच सुसाईड नोट्स वनमोरे बंधूंच्या कडून आधीच लिहून घेण्यात आले असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. मांत्रिकाने गुप्तधन शोधून देतो म्हणून गेल्या चार वर्षांपासून या वनमोरे बंधूंच्या कडून वेळोवेळी पैसे घेतले आहेत, हे पैसे वनमोरे कुटुंबाने विविध सावकारांकडून तसेच इतर ठिकाणी हातउसने घेऊन मांत्रिकाला पैसे दिले असल्याचे समोर आले आहे. ते पैसे द्यायला लागू नयेत, म्हणून हा गुन्हा घडला असल्याचे तपासात समोर आले आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT