वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्रीने आत्महत्या केली. पंख्याला गळफास लावलेल्या अवस्थेत या अभिनेत्रीचा मृतदेह आढळून आला

बंगाली टेलिव्हिजनवर या अभिनेत्रीचं खूप नाव झालं होतं. तिने आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आणि टीव्ही इंडस्ट्री शोकसागरात बुडाली

हे वाचलं का?

कोलकाता या ठिकाणी अभिनेत्री पल्लवी डेचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत मिळाला

रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. पल्लवी डे या अभिनेत्रीने गळफास लावून घेत आपलं आयुष्य संपवलं

ADVERTISEMENT

पल्लवीच्या मृत्यूबाबत समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, प्राथमिक अंदाजानुसार अभिनेत्रीने आत्महत्या केल्याचं त्यांनी म्हटलं आहे

ADVERTISEMENT

या प्रकरणी पोलिसांनी अनैसिर्गिक मृत्यूची नोंद केली आहे आणि पुढील तपास सुरू केला आहे

पल्लवी डे ही सुप्रसिद्ध बंगाली अभिनेत्री आहे, तिच्या मृत्यूच्या बातमीने तिच्या कुटुंबीयांवर आणि तिच्या चाहत्या वर्गावर शोककळा पसरली आहे

पल्लवीला रूग्णालयातही दाखल करण्यात आलं होतं पण त्याआधीच तिचा मृत्यू झाला आहे असं डॉक्टरांनी सांगितलं. तिच्या मृत्यूचं कारण काय? तिने हे टोकाचं पाऊल का उचललं? हे अद्याप समजू शकलेलं नाही.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT