लता मंगेशकर यांना साश्रू नयनांनी निरोप, भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी दिला चितेला अग्नी

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर रविवारी संध्याकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. लता मंगेशकर यांच्या चितेला त्यांचा सख्खा लहान भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी अग्नी दिला. लता मंगेशकर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याआधी लतादीदींच पार्थिव शिवाजी पार्क मैदान या ठिकाणी आणण्यात आलं. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, सुपरस्टार शाहरुख खान, सुपरस्टार आमिर खान, माजी क्रिेकेटर सचिन तेंडुलकर, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली.

ADVERTISEMENT

त्यांच्या पार्थिवावर ठेवण्यात आलेला तिरंगा हा सैन्य दलाच्या तिन्ही अधिकाऱ्यांनी सन्मानपूर्वक मंगेशकर कुटुंबीयांकडे सोपवला. त्यांचा भाऊ हृदयनाथ मंगेशकर, बहिणी आशा भोसले, उषा मंगेशकर आणि मीना खडीकर यासह सगळ्यांनाच या क्षणी अश्रू अनावर झाले होते. लता मंगेशकर यांच्या पार्थिवाला त्यांचा लहान भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनी अग्नी दिला. हृदयनाथ मंगेशकर हे लता मंगेशकर यांच्यापेक्षा आठ वर्षांनी लहान आहेत.

‘पुन्हा लता मंगेशकर म्हणून जन्म नको कारण… ‘ दीदींच्या निधनानंतर ‘तो’ व्हीडिओ व्हायरल

हे वाचलं का?

हृदयनाथ मंगेशकर हे मराठीतल्या उत्तम संगीतकारांपैकी एक म्हणून ओळखले जातात. त्यांनीही लता मंगेशकर आणि आशाताई यांच्या प्रमाणेच करिअर करण्यासाठी संगीत क्षेत्र निवडलं. अंतर्मुख करणारी गाणी, त्यांना दिलेलं संगीत हे त्यांच्यातल्या संगीतदिग्दर्शकाचं वैशिष्ट्य आहे. कवी ग्रेस, सुरेश भट, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या कवितांना त्यांनी चाली दिल्या आहेत. त्यांनी लिहिलेली गाणी आजही अजरामर आहेत.

व्हेंटिलेटरवर असताना लता मंगेशकर यांनी मागवला होता इयरफोन, जाणून घ्या काय होतं यामागचं कारण..

ADVERTISEMENT

1955 मध्ये हृदयनाथ मंगेशकर यांनी आपल्या संगीत दिग्दर्शनाच्या कारकीर्दीला सुरूवात केली. हिंदी भाषेतही त्यांनी काही सिनेमांना संगीत दिलं. मात्र मराठीतली त्यांची कारकीर्द मोठी आहे. हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत क्षेत्रात मोठं योगदान आहे. 2009 मध्ये त्यांना पद्मश्री हा सन्मान देऊन गौरवण्यात आलं. तसंच 1990 मध्ये लेकिन या सिनेमासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.

ADVERTISEMENT

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं रविवारी सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी मुंबईतल्या ब्रीचकँडी रूग्णालयात निधन झालं. मल्टिऑर्गन फेल्युअरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली अशी माहिती डॉ. प्रतित समदानी यांनी दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही रूग्णालयाला भेट दिली. त्यानंतर लता मंगेशकर या आता आपल्यात नाहीत अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. लता मंगेशकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. भारतरत्न या सर्वोच्च नागरी सन्मानाने त्यांना गौरवण्यात आलं होतं. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्या देशाच्या डोळ्यात पाणी दाटून आलं होतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT