ह्रदयद्रावक! शेतकरी दाम्पत्यानं एकाच झाडाला गळफास घेऊन संपवलं आयुष्य
राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न चर्चेत आला आहे. लातूर जिल्ह्यात एका अल्पभूधारक दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहेत. लातुर तालुक्यामधील गादवड या […]
ADVERTISEMENT
राज्यात पुन्हा एकदा शेतकरी आत्महत्येचा प्रश्न चर्चेत आला आहे. लातूर जिल्ह्यात एका अल्पभूधारक दाम्पत्यानं झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ह्रद्रावक घटना घडली आहे. आत्महत्येचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. मात्र, या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मुरुड पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस तपास करत आहेत.
ADVERTISEMENT
लातुर तालुक्यामधील गादवड या गावात एका अल्पभूधारक शेतकरी जोडप्याने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली. गादवड शिवारामध्ये लिंबाच्या झाडाला दोघांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. एकाच दिवशी पती- पत्नीने अशाप्रकारे आयुष्याचा शेवट केल्यामुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे.
बळीराम रावसाहेब कदम आणि वैशाली ऊर्फ मंगलबाई बळीराम कदम असे आत्महत्या केलेल्या शेतकरी दाम्पत्याचे नाव आहेत. ते लातूर तालुक्यातील गादवड गावातील रहिवासी आहेत. संबंधित शेतकरी जोडप्याने रात्री ११ वाजेच्या सुमारास सारसा रस्त्यावर असलेल्या त्यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला सुताच्या दोरीने गळफास घेऊन आयुष्य संपवलं.
हे वाचलं का?
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळाचा पंचनामा केला. पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेत तांदुळजा या ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनाकरिता पाठवले आहेत. शवविच्छेदन झाल्यानंतर पोलिसांकडून दोघांचे मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले जाणार आहेत. संबंधित शेतकरी जोडप्याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याविषयी कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.
मुरुड पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. नातेवाईक आणि आसपासच्या लोकांची चौकशी करत पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत. या घटनेचा तपास लातूर पोलीस करत आहेत. मृत शेतकरी दाम्पत्याला २ एकर शेतजमीन होती. त्यांचा स्वभाव शांत आणि संयमी होता. ते सर्वांबरोबर मिळून मिसळून राहत असल्याचे, अशी माहिती आसपासच्या लोकांनी दिली आहे. अशा या मनमिळावू दाम्पत्याने असा अचानक आयुष्याचा शेवट केल्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT