नात्याला काळीमा! मुल होत नसल्याने सासऱ्याकडून सुनेचा आंघोळ करताना व्हिडीओ, शारिरिक संबंधासाठी दबाव
पंढरपूर शहरात सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सुनेला आपल्या मुलापासून मुल होत नसल्यामुळे तिचा आंघोळ करताना व्हिडीओ शूट करत तिच्याकडे शारिरिक संबंधांसाठी दबाव टाकणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सासऱ्याला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी सून घरात एकटीच असताना सासऱ्याने तिच्या अंगावर हात टाकून बळजबरी […]
ADVERTISEMENT
पंढरपूर शहरात सासरा आणि सुनेच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. सुनेला आपल्या मुलापासून मुल होत नसल्यामुळे तिचा आंघोळ करताना व्हिडीओ शूट करत तिच्याकडे शारिरिक संबंधांसाठी दबाव टाकणाऱ्या सासऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी सासऱ्याला अटक केली आहे.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, आठवडाभरापूर्वी सून घरात एकटीच असताना सासऱ्याने तिच्या अंगावर हात टाकून बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी सूनेने आरडाओरडा केल्यामुळे सासऱ्याने तिला सोडलं. नंतर हा प्रकार पीडित महिलेने आपल्या पतीला सांगितल्यानंतर त्याने पीडितेची समजुत काढली.
पंढरपुरात पोलिसांनी रोखले दोन बाल विवाह
हे वाचलं का?
परंतू यानंतर वासनांध सासऱ्याने पुढच पाऊल टाकत आपल्या सुनेचा आंघोळ करताना व्हिडीओ शूट केला. हा व्हिडीओ आपल्या सूनेला दाखवत आरोपी सासऱ्याने सूनेला, तुला माझ्या मुलापासून मुल होणार नाही तू माझ्याशी संबंध ठेव असं म्हणत दबाव टाकायला सुरुवात केली. माझ्याशी संबंध ठेवले नाहीस तर व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी सासरा वारंवार सुनेवर दबाव टाकायला लागला.
क्रूरतेचा कळस! अल्पवयीन मुलीवर महिलेनं पतीला नजरेसमोर करायला लावला बलात्कार
ADVERTISEMENT
या दबावाला कंटाळून अखेरीस सुनेने हा प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. ज्यानंतर त्यांनी पंढरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करत आरोपी सासऱ्याला ताब्यात घेतलं आहे.
ADVERTISEMENT
पोलिसाने नोकरीचं आमिष दाखवून केला बलात्कार, यवतमाळमधील ‘त्या’ तरुणीच्या आत्महत्येचं गुढ उकललं
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT